Parag Agarwal | जगाची अर्थव्यवस्था भारतीयांच्या ताब्यात, मुंबईकर पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ

जगभरात जिकडे तिकडे सध्या भारतीयांचाच डंका वाजतोय. गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) पाठोपाठ आता ट्विटरवर (Twitter) भारतीय वंशाच्या अधिका-यांची नियुक्ती झालीय.

Updated: Nov 30, 2021, 10:24 PM IST
Parag Agarwal | जगाची अर्थव्यवस्था भारतीयांच्या ताब्यात, मुंबईकर पराग अग्रवाल ट्विटरचे नवे सीईओ

मुंबई : जगभरात जिकडे तिकडे सध्या भारतीयांचाच डंका वाजतोय. गुगल (Google), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) पाठोपाठ आता ट्विटरवर (Twitter) भारतीय वंशाच्या अधिका-यांची नियुक्ती झालीय. ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी (Jack Dorsy) यांनी राजीनामा दिलाय. त्यांच्या जागी कंपनीतील भारतीय वंशाचे अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांची नियुक्ती करण्यात आलीये. पराग अग्रवाल यांच्या रूपात जगभरातील टॉपच्या कंपन्यांमध्ये आणखी एका भारतीय सुपर बॉसची भर पडलीय. (Know about who is the new CEO of Twitter Parag Agarwal)

कोण आहेत पराग अग्रवाल? (Who Is Parag Agarwal)

मुंबईकर पराग यांचं चेंबूरच्या शाळेत शिक्षण झालं असून त्यांनी आयआयटी मुंबईतून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. अमेरिकेत कॉम्प्युटर विज्ञान विषयावर त्यांनी पीएचडी केलीय. आधी याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्यात काम केल्यानंतर 10 वर्षापासून ट्विटरसोबत आहेत. आता त्यांची सीईओपदी निवड झालीय. त्यामुळे आता जगातल्या टॉपच्या कंपन्यांवर भारतीयांचाच बोलबाला दिसतोय. 

जगात भारताचा डंका

जगभरातील या सुपर कंपन्यांवर नजर टाकली तर गुगलवर सुंदर पिचाई हे सीईओ म्हणून कार्यरत आहेत. तर 2014 पासून मायक्रोसॉप्टचा गाडा भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांच्या हाती आहे. IBMच्या CEOपदी अरविंद कृष्णा आहेत तर शंतनू नारायण यांच्या हाती ऍडॉबची सूत्र आहेत. अॅरिस्टा नेटवर्कचा कारभार भारतीय वंशाच्या जयश्री उलाल यांच्या हाती आहे. 

यातल्या प्रत्येक कंपन्याची वार्षिक उलाढाल ही अनेक देशांच्या बजेटपेक्षा कित्येकपट जास्त आहे. त्यामुळे आता ख-या अर्थानं जगाची अर्थव्यवस्था भारतीयांच्या ताब्यात आलीय असं म्हणायला हरकत नाही.