युद्ध थांबवायचं असेल तर पुतीनला संपवणं गरजेचं; अमेरिकन खासदाराचं धक्कादायक विधान

रशियन नागरिकांपैकी एखाद्याने पुतीन यांनाच संपवणं हाच युद्ध संपवण्याचा एकमेवर मार्ग असल्याचे खळबळजनक विधान अमेरिकन सीनेटर लिंडसे ग्रॅहॅम यांनी केले आहे.

Updated: Mar 4, 2022, 08:59 AM IST
युद्ध थांबवायचं असेल तर पुतीनला संपवणं गरजेचं; अमेरिकन खासदाराचं धक्कादायक विधान title=

नवी दिल्ली : रशियन नागरिकांपैकी एखाद्याने पुतीन यांनाच संपवणं हाच युद्ध संपवण्याचा एकमेवर मार्ग असल्याचे खळबळजनक विधान अमेरिकन सीनेटर लिंडसे ग्रॅहॅम यांनी केले आहे.

सीनेटर लिंडसे ग्रॅहॅम यांच्या ट्विटरवरुन रशिया युक्रेन युद्धावर लिहताना म्हटले आहे, रशियन नागरिकांपैकी एखाद्याने रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाच संपवणं हाच युद्ध थांबवण्यासाठी एकमेव मार्ग असल्याचे विधान केले आहे. 

ग्रॅहॅम यांचे ट्वीट जगभरात सोशल मीडियावर व्हायरल

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ग्रॅहम यांच्या  ग्रॅहम ट्विटबाबत जगभरात चर्चा सुरू झाली आहे. नक्की त्यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय ते पाहूया...

 

 

ट्वीट (मराठीत)

रशियात एखादा ब्रुटस आहे का? रशियन लष्करात कर्नल स्टाऊनबर्गसारखे आणखी कर्नल आहेत का?
रशियन नागरिकांपैकी एखाद्यानं या माणसाला (पुतीन यांना) संपवणं हाच युद्ध संपवण्याचा एकमेवर मार्ग आहे
जो कुणी हे करेल तो त्याच्या देशाची आणि जगाची मोठी सेवा करेल
रशियाचे लोकच हे जे काही घडतंय ते थांबवू शकतात
बोलायला सोपं आहे..करायला मात्र कठीण
जर तुम्हाला (रशियन लोकांना) पुढचं आयुष्य अंधारात, जगाशी कोणताही संपर्क न ठेवता, कमालीच्या दारिद्रयात काढायचं नसेल तर
तुम्हाला (रशियन लोकांना) आताच पावल उचलावी लागतील.