जंगल सफारीला गेलेल्या माणसाच्या मागे लागला सिंह, पुढे काय घडलं पाहा थरारक व्हिडीओ

कल्पना करा की तुम्ही जंगलात फिरायला गेला आहात आणि एखादा वन्यप्राणी तुमच्या मागे लागला तर?

Updated: Jan 11, 2022, 06:22 PM IST
जंगल सफारीला गेलेल्या माणसाच्या मागे लागला सिंह, पुढे काय घडलं पाहा थरारक व्हिडीओ title=

मुंबई : वन्यजीवांचे व्हिडीओ हे नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ लोकं आवडीने पाहतात. हे व्हिडीओ कधी दोन प्राण्यांमधील भांडणाचे असतात, तर कधी दोन प्राण्यांमधील प्रेमाचे असतात. कधी जंगलातील एखाद्या घटनेचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. आपल्याला हे पाहायला मनोरंजक वाटतं खरं, परंतु या सगळ्या घटना अंगावर काटा उभा करणाऱ्या असतात.

कल्पना करा की तुम्ही जंगलात फिरायला गेला आहात आणि एखादा वन्यप्राणी तुमच्या मागे लागला तर? हे खूप भीतीदायक वाटत असलं तरी हे एका व्यक्तीसोबत खरंखुरं घडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जंगलात चालताना दिसत आहे. तेव्हाच त्याला समजते की कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे. तेवढ्यात तो मागे वळून पाहतो, तेव्हा त्याला दिसतं की, एक सिंह त्याचा पाठलाग करत आहे.

सिंहाला पाहताच हा व्यक्ती काही सेकंदासाठी स्तब्ध उभा राहतो. हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे.

हा व्यक्ती जेव्हा या सिंहाला पाहतो तेव्हा काही काळासाठी त्याला काही सुचलं नसलं तरी तो नंतर आपल्या युक्तीने या सिंहाला पळवून लावतो. हा माणूस मोठा आवाज काढतो, जे ऐकून हा सिंह घाबरतो आणि झुडूपामध्ये जाऊन लपतो. ज्यानंतर हा सिंह तेथून गायब होतो. हा व्हिडीओ लॉस एंजेलिसचा आहे.

व्हायरलहॉग या अधिकृत यूट्यूब चॅनलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या टायटलमध्ये असेही लिहिले आहे. या माणसासाठी भयानक क्षण. जंगली सिंह त्याच्या मागे लागला.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. ज्यामध्ये काही लोकं असं म्हणतायत की, ही अशी घटना आहे, ज्याचा ते विचार देखील करु शकणार नाही. तर एक युजर म्हणतोय की या माणसाचं नशीब फारच चांगलं आहे.