ड्रॅगनला आव्हान देतोय हा छोटा देश, चीनला म्हणाला 'पीपल्स रिपब्लिक ऑफ कॉमेडी'

देशाची लोकसंख्या पाहाल तर व्हाल थक्क आणि चीनला म्हणतोय 'पीपल्स रिपब्लिक ऑफ कॉमेडी'

Updated: Dec 5, 2021, 09:47 AM IST
ड्रॅगनला आव्हान देतोय हा छोटा देश, चीनला म्हणाला 'पीपल्स रिपब्लिक ऑफ कॉमेडी'

चीन : लिथुआनिया हा युरोपमधील एक छोटा देश आहे. बाल्टिक समुद्राच्या काठावर वसलेल्या देशाची एकूण लोकसंख्या 29 लाखांपेक्षा थोडी जास्त आहे. असं असतानाही हा देश जगातील महासत्ता असलेल्या चीनला आव्हान देत आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध चांगले नाहीत. आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 

चीन आणि लिथुआनियाचे नेतेही शब्दयुद्धात एकमेकांना टक्कर देत आहेत. लिथुआनियाने तैवानशी असलेले संबंध ताबडतोब संपवावेत अशी चीनची इच्छा आहे, तर हा देश सार्वभौम निर्णय म्हणत मागे हटण्यास तयार नाही.

चीनला म्हणाला 'पीपल्स रिपब्लिक ऑफ कॉमेडी'
दरम्यान, चीनच्या सततच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करून, लिथुआनियाच्या एका खासदाराने बीजिंगचे वर्णन 'पीपल्स रिपब्लिक ऑफ कॉमेडी' असे केले. चीनचे पूर्ण नाव 'पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' आहे. हे खासदार दुसरे तिसरे कोणी नसून लिथुआनियन नेते मातास मालदेकीस आहेत. 

चीनकडून लिथुआनियामधील वस्तूंचा परवाना रद्द 
चीनचे ग्लोबल टाईम्सचे मुख्य संपादक हू शिजिंग यांनी एका ट्विटला उत्तर दिले की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग लिथुआनियावर हल्ला करण्यासाठी "आपला जोकर पाठवत आहेत". शिजिंग यांनी लिथुआनियाला पूर्वीप्रमाणेच ट्विटमध्ये धमकी दिली होती. 

लिथुआनियाला चीनच्या सीमाशुल्क नोंदणीतून काढून टाकण्यात आल्याचेही अहवालात स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ लिथुआनियन वस्तू चिनी बंदरांमध्ये जाऊ शकत नाही.