Bengal Warriorz Vs U Mumba: सामन्याच्या उत्तरार्धात मनजीतच्या खोलवर आणि वेगवान चढायाची जोड घेत यु मुम्बाच्या बचावपटूंनी प्रो कबड्डीच्या ११ पर्वातील शनिवारी झालेल्या लढतीत बंगाल वॉरियर्सला बरोबरीत रोखले . बचावाच्या आघाडीवर झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात यु मुम्बाने बंगाल वॉरियर्स संघ ३१-३१ यांच्यातील सामना बरोबरीत सुटला.
पूर्वार्धात पिछाडीवर राहिल्यानंतर यु मुम्बाने उत्तरार्धात सामन्याला चांगला वेग दिला. यामध्ये मनजीतच्या चढायांचा मोठा वाटा होता. त्याला रोहित यादवची चांगली साथ मिळाली. त्यातही डावा कोपरारक्षक सोमवीरने केलेल्या अचूक पकडींमुळे यु मुम्बाला वर्चस्व मिळविणे शक्य झाले. उत्तारर्धात बंगालच्या मयूर कदमने बचावातील जोश कायम ठेवला होता. पण, त्यांच्या चढाईपटूंना उत्तरार्धात आलेले अपयश त्यांच्यासाठी धोक्याचे ठरले. मनजीतने चढाईचे ७, तर सोमवीरने बचावात ५ गुणांची कमाई केली. बंगालकडून मनिंदर सिंगने चढाईचे ८, तर मयूर कदम (५) आणि नितेश कुमार (४) यंनी बचावात अचूक कामगिरी करून आव्हान राखण्याचे प्रयत्न केले.
सामन्याच्या मध्यंतराला बंगाल वॉरियर्सने बचावाच्या आघाडीवर वर्चस्व राखताना २०-१३ अशी आघाडी घेतली होती. पूर्वार्धात एक लोण चढवत बंगालने आपला धडाका कायम राखला होता. कर्णधार फझल अत्राचली आणि नितेश कुमार या बचावपटूंचा यात मोठा वाॉटा होता. मनिंदरसिंगनेही चढाईपटू म्हणून आपली कामगिरी चोख बजावली होती. यु मुम्बाच्या खेळाडूंना लय गवसली नव्हती.
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
NZ
(20 ov) 175/6
|
VS |
SA
107(15.3 ov)
|
| New Zealand beat South Africa by 68 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CYP
(20 ov) 136/8
|
VS |
AUT
140/3(16.3 ov)
|
| Austria beat Cyprus by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
OMA
(20 ov) 136/8
|
VS |
NEP
140/3(16.3 ov)
|
| Match Postponed | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.