मुंबई : गुगलवर आपल्यासोबत बऱ्याचदा असे होते की, आपल्याला काही गोष्टी किंवा ठिकाण ब्लर दिसतात, तर काही वेळा ते दिसत देखील नाही. त्याचप्रमाणे काही वेळा गुगल आपल्याला जो रस्ता दाखवतो तेथे खरे तरं रस्ताच नसतो. या अशा ठिकाणांमध्ये रशियाचे रहस्यमय बेट, उत्तर कोरियाचा एक भाग आणि फ्रान्सचे मोरुरोआ बेट यासारख्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत ज्यांचं गुगल मॅपवरती अस्तित्व नाही किंवा गुगल मॅप त्या ठिकाणांना ब्लर किंव अस्पष्ट दाखवत आहे.
द सन मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, रशियाचे जेनेट बेट गुगल मॅप्सवर अस्पष्ट दिसते. हे बेट पूर्व सायबेरियन समुद्रात आहे. ते पूर्णपणे बर्फाने झाकलेले आहे. मात्र, हे बेट गुगल मॅपवर का दाखवले जात नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गुगल मॅप्सवर उत्तर कोरियाचे काही भाग अस्पष्ट दिसतात. गुगल मॅप्सवर उत्तर कोरियाची डावी बाजू अस्पष्ट दिसते. याशिवाय ग्रीसचा लष्करी तळही अस्पष्ट दिसतो. लष्करी तळ असल्यामुळे त्या भागाला गुगल मॅपवर दाखवले गेले नसावे.
जगभरात अशी अनेक कारागृहे आहेत, जी गुगल मॅपवर दाखवली जात नाहीत, कारण ती संवेदनशील क्षेत्र मानले जातात. मध्य फ्रान्समधील Montlucon तुरुंग देखील गुगल मॅप्सवर दाखवले जात नाही. गुगल मॅपवर मॉन्टलुकॉन कारागृहाचे स्थान अस्पष्ट आहे.
फ्रान्सचे Montlucon बेट गुगल मॅप्सवर अस्पष्ट दिसते. Montlucon बेट दक्षिणेस प्रशांत महासागरात आहे. फ्रान्सने येथे 1966 ते 1996 दरम्यान सुमारे 181 अणुचाचण्या केल्या गेल्या आहेत.
युनायटेड किंगडममधील प्रिन्सपोर्ट रोडवरील एक घर गुगल मॅप्सवर अस्पष्ट दिसत आहे. हे गेल्या 21 वर्षांपासून त्या ठिकाणी आहे, तरी देखील ते गुगल मॅपवर दिसत नाही. पण यामागचे कारण स्पष्ट झालेलं नाही.