Corona : ६ महिन्यानंतर कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने या देशात लॉकडाऊनची घोषणा

कोरोनावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचा नवा रुग्ण आढळल्याने खळबळ

Updated: Aug 17, 2021, 04:24 PM IST
Corona : ६ महिन्यानंतर कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने या देशात लॉकडाऊनची घोषणा title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडमध्ये 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा कोरोना विषाणूने ( corona virus ) डोकं वर काढलं आहे. कोविड-19 चे नवीन प्रकरण सापडल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न ( new zealand pm ) यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मंगळवारी देशातील सर्वात मोठे शहर ऑकलंडमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला. त्यानंतर थोड्याच वेळात, पंतप्रधान आर्डर्न ( jacinda ardern ) यांनी देशात तीन दिवसांच्या लॉकडाऊनचे आदेश दिले.

आर्डर्न यांनी म्हटलं की, नवीन प्रकरण डेल्टा प्रकार असल्याचे अधिकाऱ्यांना वाटते. याची पुष्टी झालेली नाही. न्यूझीलंडमध्ये सहा महिन्यांपासून कोणत्याही संक्रमणांची नोंद केली नाही, परंतु आम्ही 'गेम चेंजर' डेल्टा स्ट्रेनसह कोणताही धोका घेऊ शकत नाही. आर्डर्न म्हणाले की ऑकलंड, जिथे संक्रमित व्यक्ती राहत होती आणि कोरोमंडल, जिथे त्याने भेट दिली होती. त्या ठिकाणी सात दिवस आणि उर्वरित देशात तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन असेल. ( new zealand pm announces lockdown )

कोविडचं पहिले प्रकरण न्यूझीलंडमध्ये 6 महिन्यांनंतर दिसून आले आहे. यापूर्वी देशातील शेवटचा कोरोना विषाणूचा संसर्ग फेब्रुवारीमध्ये नोंदवण्यात आला होता. ऑकलंडमधील 58 वर्षीय व्यक्तीमध्ये कोविड -19 चे संक्रमण आढळून आले आहे. या व्यक्तीला संसर्ग कसा झाला, हे देशाच्या आरोग्य मंत्रालयाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. सध्या त्याचा तपास सुरू आहे.

संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी ती व्यक्ती पूर्वी कोणाच्या संपर्कात आली होती हे शोधण्यासाठी ऑकलंडचे स्थानिक सार्वजनिक आरोग्य युनिट संक्रमित व्यक्तीची चौकशी करत आहे.