ब्रिटन : ब्रिटनची राजधानी लंडनच्या एसेक्स भागामध्ये ३९ मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ३८ वयस्कर आणि एक किशोरवयीन मुलाचा मृतदेह यात आढळला आहे. या घटनेनंतर २५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या मृतदेहांची ओळख पटवत आहेत. ताब्यात घेण्यात आलेला ड्रायव्हर लॉरी कंटेनर चालवत होता. कंटेनरच्या ड्रायव्हरनेच ३९ जणांची हत्या केल्याचा संशय वर्तविला जात आहे. तपास झाल्यानंतर यासंदर्भात माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुधवारी दुपारी १.४० वाजता ईस्टर्न एवेन्यूमध्ये वाटग्लेड इंडस्ट्रियल पार्कमध्ये मृतदेह असल्याची माहीती कळताच रुग्णवाहीका बोलावण्यात आली. पोलीस पीडितांची ओळख पटवक असल्याचे वरिष्ठ अधिकारी एंड्र्यू मारिनर यांनी सांगितले.