गर्लफ्रेंड दररोज करायची 100 हून अधिक फोन, ब्रायफ्रेंडची पोलिसात धाव... डॉक्टरांनी सांगितला 'हा' आजार

Love Brain Disorder : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडच्या प्रेमाची एक अजब घटना समोर आली आहे. आपल्या बॉयफ्रेंडवर असणाऱ्या अतिप्रेमामुळे एका मुलीला रुग्णालायत दाखल करावं लागलं आहे. बॉर्डरलाइन पर्सनैलिटी डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचं निदान डॉक्टरांनी केलंय.

राजीव कासले | Updated: Apr 24, 2024, 06:47 PM IST
गर्लफ्रेंड दररोज करायची 100 हून अधिक फोन, ब्रायफ्रेंडची पोलिसात धाव... डॉक्टरांनी सांगितला 'हा' आजार title=

Love Brain Disorder: असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. प्रेमात जात-पात धर्म, श्रीमंत गरीब काही बघितलं जात नाही. प्रेमात सर्वात महत्त्वाचा असतो तो एकमेकांवरचा विश्वास. पण विश्वासाची जागा संशयाने घेतली की मात्र अनेकवेळा याचे विपरीत परिणाम होतात. इतकंच काय तर काही वेळा जोडीदारावर असलेलं अतिप्रेमही धोकादायक ठरू शकतो. अशीच काहीशी एक घटना समोर आली आहे. एका मुलीला आपल्या प्रियकरावर इतकं प्रेम होतं की त्याच्यासाठी ती अक्षरश वेडी झाली. तिला प्रियकराचा प्रत्येक क्षण जाणून घ्यायचा होता. म्हणजे तो काय करतोय, कुठे जातोय,यासाठी ती तिच्या प्रियकाराला दिवसातून एक-दोन नाही तर तब्बल 100 हून अधिकवेळा फोन आणि मेसेज करायची. दिवसेंदिवस यात वाढ होऊ लागल्याने  प्रियकराची सहनशक्ती संपली आणि त्याने थेट पोलिसात धाव घेतली. 

प्रियकराला दिवसातून 100 कॉल्स
ही घटना चीनमधली (China) आहे. इथं राहाणाऱ्या 18 वर्षांच्या जियाओयू या मुलाचं कॉलेजमधल्या एका मुलावर जीव जडला. मुलाने तिच्या प्रेमाचा स्विकार केला. पण जियाओयू त्याच्याच गुंतत गेली. इतकं की तिचा प्रियकर कोणाबरोबर आहे, कुठे आहे याची प्रत्येक माहिती तिला हवी असायची. यासाटी ती प्रियकराला सतत फोन आणि मेसेज करु लागली. 

पण जियाओयूच्या वागण्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. दिवसातून जवळपास 100 हून अधिक वेळा ती प्रियकारला फोन आणि मेसेज करु लागली. धक्कादायक म्हणजे यातल्या एकाही फोन किंवा मेसेजला उत्तर दिलं नाही तर तिचा पारा चढत होता. फोन किंवा मेसेजला उत्तर दिलं नाही की ती घरातील सामानाची मोडतोड करायची. वारंवार या घटना होऊ लागल्याने घाबरलेल्या प्रियकरांने जियाओयू आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी पोलिसात धाव घेतली.

डॉक्टरांनी सांगितला 'हा' आजार
प्रकरण आणखीच गंभीर बनत गेलं. एके दिवशी जियाओयूने आपल्या घरातल्या बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी पोलीस पोहोचल्याने पुढची घटना घडली नाही. यानंतर मुललीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारात डॉक्टरांनी मुलीला लव्ह ब्रेन डिसऑर्डरची (Love Brain Disorder) लागण झाल्याचं सांगितलं.

लव्ह ब्रेन म्हणजे काय?
वास्तविक लव्ह ब्रेन डिसॉर्डर हा कोणताही वैदकीय शब्द नाही. जोडीदाराच्या प्रेमात सर्व सीमा पार करणाऱ्यांसाठी या शब्दाचा प्रयोग केला जातो. जेव्हा आपण एखाद्यावर प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करू लागतो आणि त्याच्यावर अवलंबून राहू लागतो. किंवा जेव्हा एखाद्याचे प्रेम जोडीदारावर इतकं प्रबळ होतं की तो व्यक्ती आपल्यासोबत हवासा वाटतो आणि त्यांच्यासोबत राहावंसं वाटतं याला लव्ह ब्रेन म्हणतात. यामुळेच जियाओऊला आपल्या प्रियकराने प्रत्येक फोन आणि मेसेजचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा होती.