Maasai Tribe Wedding Ritual: लग्न (Marriage) म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. प्रत्येकाची लग्नासाठी काही ना काही इच्छा असते. लग्नात वेगवेगळ्या प्रथा (Wedding Tradition) पाळल्या जातात. विविध धर्म, जाती, पंथाच्या लोकं स्वतःची परंपरा जपण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अशी एक परंपरा आहे. जी ऐकून तुम्हालाही किळसवाणा प्रकार वाटेल. मात्र, ही परंपरा आजही कायम आहे. (maasai tribe father spits on daughters head after marriage ritual tradition marathi news)
केनिया (Kenya) आणि टांझानियामध्ये (Tanzania) मसाई नावाची जमात राहते. तिथं मुलीच्या लग्नानंतर निरोपावेळी वडिलांना एक विचित्र प्रथा पाळावी लागते. या जमातीचे लोक अतिशय विलक्षण परंपरा पाळतात. मुलीचा निरोप घेतल्यानंतर वडील आपल्या मुलीवर थुंकून (father spits on daughter during vidai) माहेरच्या घरचा निरोप देतात.
भारतात देखील धुमधडाक्यात लग्नसोहळा (wedding ceremony) साजरा केला जातो. ढोल ताशा पथक, हल्दी, संगीत असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. असा कार्यक्रम केनिया आणि टांझानिया पहायला मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या अतिशय गरिब असलेल्या या देशात पांरपारिक पद्धतींना महत्त्व दिलं जातं.
आणखी वाचा - Trending: एज इस जस्ट नंबर! वृद्ध सरदारांचा भांगडा डान्स व्हायरल; पाहा Video
दरम्यान, जेव्हा मुलीला निरोप दिला जातो तेव्हा वडील घरोघरी तिच्या डोक्यावर थुंकतात. मसाई जमातीच्या (Maasai Tribe Wedding Ritual) लोकांच्या लग्नात निरोप देताना केला जाणारा हा सर्वात खास विधी आहे. प्रत्येक बापाला ती पूर्ण करायची असते. त्याशिवाय लग्न पुर्ण होत नाही, अशी मान्यता या समाजत आहे.