काय म्हणता! माणूसही 180 वर्ष जगणार? दीर्घायुष्य देणारी संजीवनी सापडली ?

 येत्या काळात माणासाचं आयुष्य दुपटीनं वाढणार आहे, कॅनडातील संशोधकांचा दावा

Updated: Jan 24, 2022, 10:27 PM IST
काय म्हणता! माणूसही 180 वर्ष जगणार? दीर्घायुष्य देणारी संजीवनी सापडली ? title=

Scientists Claim : आपण 100 वर्ष जगावं असं प्रत्येकाला वाटतं, अलिकडच्या काळात हेच आयुष्य सरासरी 60 ते 70 वर्ष इतकं झालं आहे. पण येत्या काळात माणासाचं आयुष्य दुपटीनं वाढणार आहे. माणूस 180 वर्षांपर्यंत जगू शकतो असा दावा कॅनडातील संशोधक लियो बेल्जिल यांनी केला आहे. अर्थात संशोधनाअंती पुढील शतकापर्यंत हे जगण्याचं नवं तंत्र विकसीत होईल असंही त्यांनी सांगितलं आहे. 

लियो बेल्जिल यांच्या म्हणण्यानुसार पुढील शतकात म्हणजेच 2100 मध्ये माणूस 180 वर्षांपर्यंत जगू शकतो. तर या शतकाच्या अखेरीस माणसाचं सरासरी आयुष्य 130 वर्ष असेल. मात्र त्यासाठी लोकांना वेगवेगळ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतील. माणसाचं सरासरी आयुष्य वाढलं तरी शारीरिक मर्यादेमुळे त्यांना फारसं काम करता येणार नाही, स्वाभाविकच त्यांच्या संगोपनाच्या खर्चाचा ताण सरकारवर येईल. 

विशेष म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस यांनी यापूर्वीच असे प्रयत्न सुरू केले आहेत.  चिरतरूण राहण्यासाठी त्यांच्या अल्टोस लॅबमध्ये प्रयोग सुरू आहेत. 

ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीचे शास्त्रज्ञ हॅल बेरॉन यांच्यावर या लॅबची धुरा सोपवण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसानं वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवलीय. त्यामुळे माणसाच्या दीर्घायुष्याचं संशोधनही प्रगत झालं तर जगायला आयुष्यही कमी पडणार नाही.