"जैश-ए-महंमद" झाली आता "अल मुराबितून"...

अमेरिकेच्या दबावामुळे मसूद अजहरने आपल्या संघटनेचं नाव बदललं आहे.

Updated: Jan 4, 2018, 05:57 PM IST
"जैश-ए-महंमद" झाली आता "अल मुराबितून"... title=

नवी दिल्ली : अमेरिकेच्या दबावामुळे मसूद अजहरने आपल्या संघटनेचं नाव बदललं आहे.

अमेरिकेचा दबाव

मसूद अजहर चालवत असलेली पाकिस्तानातली दहशतवादी संघटना जैश-ए-महंमद आपल्या भारतविरोधी कारवायांसाठी कुप्रसिद्द आहे. अनेक दहशतवादी कारवायांसाठी मसूद अजहर भारताला हवा आहे. सध्या भारताने अमेरिकेच्या साथीने दहशतवादाविरूद्ध जोरदार आघाडी उघडली आहे. यामुळेच अनेक दहशतवादी संघटनांवर दबाव वाढला आहे.

जैश-ए-महंमद" आता "अल मुराबितून

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मसूद अजहरने गुप्तपणे आपल्या संघटनेचं नाव "जैश-ए-महंमद" वरून बदलून "अल मुराबितून" असं केलं असल्याची माहिती गुप्तहेर खात्याकडून आल्याचे सूत्रांकडून कळाले आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार इस्लामाबाद, कराची, लाहोर आणि रावळकोट इथल्या शाळा आणि कॉलेजांमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार करण्यासाठी मसूद अजहर या नावाचा वापर करतोय. 

लष्कर-ए-तोयबा आणि तालीबानशी स्पर्धा

परंतु मसूद अजहर संघटनेचं नाव बदलण्यामागे अमेरिकेचा दबाव एवढं एकच कारण नाही. भारतविरोधी कारवायांमध्ये करायची असलेली वाढ हेसुद्धा त्यामागचं कारण आहे. लष्कर-ए-तोयबा आणि तालीबानच्या काश्मीर खोऱ्यातल्या कारवाया वाढल्या आहेत. त्या तुलनेत जैश-ए-महंमद काहीशी मागे पडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतविरोधी कारवाया करण्याचा दबाव मसूद अजहर आणि जैश-ए-महंमद वर आहे.

बदलते डावपेच

यामुळेच संघटनेच नाव बदलून आपला पाया वाढवायचा आणि आपलं स्थान बळकट करायचा मसूदचा डाव आहे. यामुळेच शाळा, कॉलेजांमध्ये पत्रकं वाटून, वेगवेगळे कार्यक्रम करून तरुणांमध्ये आपली लोकप्रियता वाढवायचा प्रयत्न मसूद करतोय. जास्तीत जास्त तरुणांची भरती करून भारतविरोधी कारवाया वाढवण्यासाठीचे हे जैश-ए-महंमदचे डावपेच आहेत.