'या' वाळवंटाला म्हणतात भुतांचं वाळवंट; इथून ये-जा करणाऱ्यांना ऐकू येतो गूढ आवाज

हा गूढ आवाज अनेक शतकांपासून लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलाय

Updated: Aug 24, 2022, 12:51 PM IST
'या' वाळवंटाला म्हणतात भुतांचं वाळवंट; इथून ये-जा करणाऱ्यांना ऐकू येतो गूढ आवाज title=

मोरोक्को : जगात रहस्यांची काही कमतरता नाही. रहस्यमयी जागांपैकी एक म्हणजे मोरोक्कन वाळवंट. जिथे लोकांनी शतकानुशतकं रहस्यमय संगीत ऐकलंय. कधी ड्रम तर कधी गिटार यांचे आवाज या वाळवंटात ऐकू येतात. काहीवेळा लोक व्हायोलिन किंवा इतर वाद्यांचे सूर ऐकू शकतात. हा असा वाळवंटी प्रदेश आहे जिथे माणसांच्या खुणा फार दूरपर्यंत दिसत नाहीत. पण हा गूढ आवाज अनेक शतकांपासून लोकांच्या कुतूहलाचा विषय बनलाय.

हे गूढ संगीत ऐकणारा प्रत्येक व्यक्ती थक्क होतो. या ठिकाणाहून जाणार्‍या लोकांचा असा विश्वास आहे की, इथे भुतं राहत असतील आणि ती ये-जा करणाऱ्यांना घाबरतात. हे अनेक दशकांपासून सुरू आहे. पण याचं नेमकं कारण कोणालाच सापडलं नाही. 

13व्या शतकात जेव्हा प्रवासी मार्को पोलो पहिल्यांदा चीनमध्ये पोहोचला तेव्हा त्याने तिथल्या वाळवंटी भागातही अशाच संगीताचे सूर ऐकले होते. मार्को पोलोने असा अंदाज लावला की, हे कदाचित वाळवंटात भटकणारे आत्मे आहेत. 

काय आहे यामागे सत्य?

या वाळवंटात संगीत ऐकण्याचं कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. लॅबमध्ये बऱ्याच चाचण्या केल्यानंतर असं आढळून आलं की, वाळवंटात तयार झालेल्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली वाळू सरकते. त्यामुळे हे संगीत त्याच्या कंपनातून निर्माण होतं.

संशोधकांच्या मते, वाळूच्या कणांचा आकारही यासाठी कारणीभूत आहे. कणांचा आकार आणि वाळूच्या हालचालीचा वेग हे त्या संगीताच्या आवाजाचे मुख्य घटक आहेत.

जेव्हा वाळवंटात जोरदार वारा वाहतो तेव्हा या सर्व प्रक्रिया वाळूच्या हालचालीमुळे वातावरणात संगीताच्या आवाजाच्या रूपात पसरतात आणि हाच गूढ आवाज लोकांना ऐकू येतो.

(Disclaimer: वर दिलेल्या जागेची माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)