close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमेरिकेतील अंदाधुंद गोळीबारात एका ठार, सहा जखमी

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर गुरुवारी रात्री गोळीबार करण्यात आला. 

Reuters | Updated: Sep 20, 2019, 10:16 AM IST
अमेरिकेतील अंदाधुंद गोळीबारात एका ठार, सहा जखमी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या व्हाईट हाऊसपासून काही अंतरावर गुरुवारी रात्री वॉशिंग्टन डीसीमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक ठार तर सहा जण  जखमी झाल्याचे वृत्त स्थानिक मीडियाने दिले आहे. दरम्यान, या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी लोक भयभित झाले होते. अमेरिकेतील माध्यमांकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. तर या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एबीसी समुहाशी निगडीत डब्लूजेएलए टीव्हीने ट्विटरवरून गोळीबारात जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असल्याची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. शहरातील कोलंबिया स्ट्रीटवर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेत सहा जणांना गोळ्या लागल्या असल्याची माहिती अमेरिकेतील स्थानिक वाहिनी फॉक्स-५ ने दिली आहे.