VIRAL व्हिडिओ : 'मोदींच्या पत्नी'साठी गार्डनं उघडला दरवाजा...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं. 

Updated: Jun 27, 2017, 01:59 PM IST
VIRAL व्हिडिओ : 'मोदींच्या पत्नी'साठी गार्डनं उघडला दरवाजा...  title=

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी त्यांचं स्वागत केलं. 

यावेळी, मोदींचं स्वागत करण्यासाठी ट्रम्प जोडप्याला दरवाज्यावर त्यांची वाट पाहतानाही पाहिलं गेलं... दोघांनी गाडीतून खाली उतरलेल्या मोदींचं स्वागत केलं... यावेळचाच एक व्हिडिओ सध्या सोशल व्हिडिओवर व्हायरल झालाय. 

त्याचं झालं असं की नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया समोरच उभे होते. मोदींची गाडी समोर येऊन थांबली तेव्हा दोन्ही बाजुंनी गार्ड आले... आणि उजव्या बाजुनं मोदींसाठी गाडीचा दरवाजा उघडला गेला... दुसरीकडे डाव्या बाजुच्या गार्डनंही दरवाजा उघडला... पण, गाडीत मोदी एकटेच होते... 

त्यामुळेच हा व्हिडिओ थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला. गार्ड नेहमीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांच्या पत्नीसाठीही गाडीचा दरवाजा उघडतात. त्यामुळे, यावेळीही गार्डनं "मोदींच्या पत्नीसाठी' गाडीचा दरवाजा उघडल्याचं म्हटलं जातंय.