Nepal Plane Crash : विमानाचे छोटे तुकडे, 14 मृतदेह हाती; दृश्य विचलित करणारी

विमान अपघाताचे पहिले धक्कादायक फोटो समोर, भीतीनं काटा उभा राहिल

Updated: May 30, 2022, 10:26 AM IST
Nepal Plane Crash : विमानाचे छोटे तुकडे, 14 मृतदेह हाती; दृश्य विचलित करणारी  title=

नेपाळ : खराब वातावरणामुळे विमान अपघाताच्या घटना वाढत असल्याचं समोर येत आहे. डोंगरांवरून विमान उड्डाण करणं हे दिवसेंदिवस खराब हवामानामुळे जीवघेणं होत असल्याचं दिसत आहे.  4 भारतीयांसह 22 प्रवशांना घेऊन जाणारं विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. 

नेपाळमध्ये तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचे पहिले फोटो सोमवारी समोर आले. मुस्तांग भागातील कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडले. 

या विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह 22 प्रवासी होते. या विमानाचे पोखरा ते जोमसोमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले होते. विमान मस्तंगला पोहोचताच संपर्क तुटला होता. त्यानंतर अपघात झाल्याची माहिती समोर आली.

 

हा अपघात एवढा भीषण होता की या विमानाचे छोटे छोटे तुकडे झाले. आतापर्यंत रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 14 मृतदेह हाती आले आहेत. या विमानाच्या अवशेषाचे फोटो मन विचलित करणारे आहेत. 

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सैन्यदलासह स्थानिक लोकही मदत करत आहेत. हा अपघात एवढा भयंकर होता की विमानाचे छोटे छोटे तुकडे झाले. मग मृतदेहांचं काय झालं असेल याचा विचार न केलेलाच बरा. 

मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार नेपाळच्या तारा एअरलाइनचे वेपत्ता झालेले 9 NAET डबल इंजिन असलेले विमान मस्तंगच्या कोवांग गावात सापडले आहे. 

खराब हवामानामुळे कोवांग गावात विमान कोसळल्याचे नेपाळ विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रमुखांनी विमानाच्या अपघाताला दुजोरा दिला आहे. 

विमान आणि प्रवाशांची स्थिती अद्याप समजू शकलेली नाही. घटनास्थळी बर्फवृष्टी होत असल्याने बचावकार्य काही काळ थांबवावे लागलं होतं. आता पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.