लंडन : पुरूषांमध्ये असलेल्या इन्फर्टिलिटीच्या समस्यांपासून आता मुक्ती मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. काही वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत स्पर्म सेल बनवण्याचा दावा केला आहे. ५०० पुरूषांपैकी एका व्यक्तीमध्ये एक्स आणि व्हाय क्रोमोझोम असतात जे स्पर्म प्रोडक्शनमध्ये अडथळा निर्माण करतात.
नर उंदिरांचा वापर करून लंडनच्या फ्रान्सिस क्रिक इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिक मल्टिपर्पज स्टेम सेल्स निर्माण केले आहेत. जेव्हा या सेल्सचा प्रयोग नर उंदिरांवर करण्यात आला तेव्हा त्यांच्यातील स्पर्म प्रोडक्शन वाढलं. ज्यामुळे त्यांच्याकडून मादा उंदिर फर्टिलाइज होण्यास तयार होत्या. जर हाच प्रयोग पुरूषांमध्ये केला गेला तर भविष्यात हे पुरूष वडिल होण्याचा आनंद घेऊ शकतात. युके सारख्या देशांत या ट्रीटमेंट पुढे पाढवण्यासाठी काही कायद्यात बदल केले आहेत. युकेमध्ये मुलं जन्माला घालण्यासाठी आर्टिफिशल स्पर्म प्रॉड्यूस करण्यावर प्रतिबंध आहे.
स्टेम सेल्सला फर्टाइल स्पर्म बनविणे संभव आहे. या प्रक्रियेत भरपूर वेळ आणि मेहनत घ्यावी लागते. ही माहिती फ्रांसिस क्रिक इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. हा विषय सध्या खूप चर्चेत आहे.