मुलीच्या जन्मानंतर पंतप्रधानांचा लग्नबंधनात अडकण्याचा विचार

तारीख वगैरे .... 

Updated: Nov 12, 2020, 11:40 AM IST
मुलीच्या जन्मानंतर पंतप्रधानांचा लग्नबंधनात अडकण्याचा विचार
प्रतिकात्मक छाया

मुंबई : मागील बऱ्याच काळापासून न्यूझीलंड New Zealand  देशाच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न Jacinda Ardern साऱ्या जगभरात चर्चेत आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यांनी देशात राबलेले नियम असो किंवा आणखी काही. अर्डर्न या कायमच या चर्चांच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं. सध्याही त्यांच्याबाबतची अशीच एक चर्चा रंगत आहे. ही चर्चा आहे खुद्द पंतप्रधानांच्याच विवाहाबाबतची. 

जेसिंडा अर्डर्न यांनी अखेर आपल्या लग्नाचे बेत असल्याचं सांगितल्याचं वृत्त अनेत माध्यमांन प्रसिद्ध केलं आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या अर्डर्न यांचा लग्नाचा विचार आहे, पण त्यासाठीची तारीख वगैरे निश्चित झाली नसल्याची बाब समोर येत आहे. 

बुधवारी New Plymouth शहरात खुद्द अर्डर्न यांनीच याबाबतची माहिती दिली. लग्नाचा कोणताही बेत आखण्यापूर्वी त्याबाबत मित्रमंडळी आणि कुटुंबीयांना कल्पना द्यावी लागू शकते असं त्या म्हणाल्या. 

Jacinda Ardern

 

अर्डर्न या ४० वर्षांच्या असून, ४४ वर्षीय टेलिव्हिजन सूत्रसंचालक क्लार्क गेफर्ड यांच्याशी त्या engage आहेत. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्डर्न यांच्या नावाची बहुविध कारणांनी चर्चा असते. त्यामुळं त्यांच्या वैयक्तिक जीवनातल या टप्प्याबाबतची काहींना कुतूहल आहे.