नायजेरियात आत्मघातकी हल्ला कोणी केला?

 पूर्व नायजेरियातील मशिदित एका युवकाने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा हल्ला कोणी केला अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, काही दहशतवादी संघटनांवर या हल्ल्याचा संशय घेतला जात आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 21, 2017, 08:41 PM IST
नायजेरियात आत्मघातकी हल्ला कोणी केला? title=

माईडगुरी : पूर्व नायजेरियातील मशिदित एका युवकाने आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 50 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, हा हल्ला कोणी केला अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, काही दहशतवादी संघटनांवर या हल्ल्याचा संशय घेतला जात आहे.

हल्याचा संशय असलेल्या दहशतवादी संघटना

मशिदिवर हल्ला झाल्यावर पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यन्वित केली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही हल्लेखोर अथवा दहशतवादी संघटनेपर्यंत पोहचण्यास पोलिसांना यश आले नाही. मात्र, बोको हराम, लष्कर ये तोयबा, आयसीस, मुस्लिम ब्रदरहूड अशा अनेक दहशतवादी संघटनांवर या हल्ल्याचा संशय घेतला जात आहे.

कसा घडला हल्ला 

ही घटना मंगळवारी सकाळी घडली. नायजेरियातील एडमवा राज्यात ही मशिद होती. या मशिदीत सकाळच्या प्रार्थनेसाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एक यूवक तेथे आला आणि त्याने स्वत:ला उडवून दिले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. परिसरात अफवांचे पीक आले. लोक घाबरून गेले.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या घटनेनंतर पोलिस प्रवक्ते, ओथमान अबुबकरने सांगितले की, या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्विकारली नाही. मात्र, हा हल्ला बोको हरम या अतिरेकी संघटनेने केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

बोको हरम हा कट्टर इस्लामी समूह एडमवा शेजारील राज्य बोर्नोमधला आहे. तसेच, यापूर्वीही यासारख्या अनेक कारवायांसाठी या समूहाला दोषी ठरविण्यात आले आहे.