नवी दिल्ली : निर्बंध घालून उत्तर कोरियांच्या अण्वस्त्र सज्जतेला आळा घालण्याच्या अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राची 'बॅन डिप्लोमसी' फेल ठरताना दिसत आहे. कारण, उत्तर कोरिया अमेरिकेच्या नाकावर टिच्चून आपल्या वस्तूंची निर्यात दिवसेंदिवस वाढवतच आहे. तसेच, जगभरातील अनेक देशांतून त्याला प्रतिसादही मिळताना दिसत आहे.
संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटले आहे की, घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करत उत्तर कोरिया कोळसा, लोखंड, स्टील आदी गोष्टींची निर्यात करत आहे. या निर्यातीतून उत्तर कोरियाने तब्बल १३ अरब डॉलर (२०० मिलीयन डॉलर) इतका फायदा कमावला आहे. महत्त्वाचे असे की, संयुक्त राष्ट्राचे निर्बंध चुकवून निर्यात करण्यासाठी उत्तर कोरियाने नवेच जुगाड काढले आहे. संयुक्त राष्ट्रा्ंना चकवा देण्यासाठी उत्तर कोरियाने आपल्या समुद्री मार्गातही बदल केला आहे. या गुप्त मार्गावरूनच कोरियाची जहाजे ये-जा करतात असेही संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्र विशेष अभ्यासकांच्या एका गटालाही उत्तर कोरियाच्या उत्तर कोरियाच्या या नव्या जुगाडाचे पुरावे मिळाले आहेत. बॅलेस्टीक क्षेपणास्त्र निर्मितीसाठी करण्यासाठी उत्तर कोरिया नेहमीच आक्रमक आहे. पण, त्याचे सिरियासोबत सैन्यसहकार्यही जोरात सुरू असल्याची माहिती आहे. तसेच, उत्तर कोरिया तशा प्रकारच्या सर्व वस्तू आणि उत्पादनांची निर्यात करत आहे. ज्यावर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली आहे. उत्तर कोरियाने जानेवारी ते सप्टेबर २०१७ या काळात सुमारे २०० मिलीयन डॉलर केवळ अवैध निर्यातीतुन कमावले आहेत. चीन, मलेशिया, दक्षिण कोरिया, रशिया आणि व्हिएतनामला उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणावर निर्यात केली आहे.