नवी दिल्ली : उत्तर कोरिया आपल्या अणू क्षेपनस्त्राचे एकामागे एक परीक्षण करत आहे. यामुळे अमेरिका चिंतेत आहे. अणू परीक्षणाच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. उत्तर कोरिया मिसाईलने कधीही अमेरिकेवर हल्ला करु शकते असं म्हटलं जातंय. उत्तर कोरियातून डायरेक्ट अमेरिकेत हल्ला करण्यासाठी मिसाईल बनवण्यात उत्तर कोरियाला यश मिळालं आहे.
दोन अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार असं कळतंय की अमेरिकेच्या चिंता वाढल्या आहेत. अधिकाऱ्यांच्या नुसार, उत्तर कोरियाने केलेल्या एका मिसाईल परीक्षणात हे समोर आलंय की ते अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये मिसाईल हल्ले करु शकतात. यामुळे अमेरिकेच्या चिंता वाढल्या आहेत.
उत्तर कोरियाने शनिवारी म्हटलं होतं की, त्यांनी आणखी एक इंटर कॉन्टिनेंटल बैलिस्टिक मिसाईलचं यशस्वी परीक्षण केलं आहे. ज्यामुळे असं कळतंय की ते अमेरिकेवर हल्ला करण्यास सक्षम आहेत. शुक्रवारी मध्यरात्री मिसाइल परीक्षणदरम्यान उत्तर कोरियाचा तानाशाह नेता किम जोंग देखील तेथे उपस्थित होता. ज्याने याला अमेरिकेला मोठं आव्हान असल्याचं म्हटलं आहे.