गुआम : प्रशांत महासागरातल्या अमरिकेच्या गुआम तळावर हल्ला करण्याची योजना येत्या काही दिवसांत तयार होईल, असं उत्तर कोरियानं म्हटलंय.
उत्तर कोरियाच्या राष्ट्रीय वाहिनीवर याबाबत वृत्त देण्यात आलंय. ही योजना देशाचे नेते किम जोंग उन यांच्याकडे सादर केली जाईल आणि त्यांच्या मान्यतेनंतर अमलात आणली जाईल, असं या वृत्तात म्हटलंय.
गुआमवर चार मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागण्याची ही योजना आहे. उत्तर कोरियाच्या या धमकीमुळे गुआम या छोट्याशा देशात तणावाचं वातावरण असलं, तरी असा हल्ला होण्याची शक्यता तिथल्या नागरिकांना वाटत नाहीये.