मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोकं वर करत आहे. अशातच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. कोरोनामुळे 37 वर्षीय नर्स मोनिका अल्मेडा तब्बल 45 दिवस कोमात होती कोमात असलेल्या नर्सला व्हायग्रा (Viagra)च्या मदतीने वाचली आहे. डॉक्टरांनी व्हायग्राच्या मदतीने तिचा जीव वाचवला. आणि धक्कादायक बाब म्हणजे ही कृती तिच्या सहकाऱ्यांनीच केली आहे.
शुद्धीवर येताच मोनिकाने आपल्या डॉक्टरांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. मोनिकाला शुद्धीवर आणण्यासाठी डॉक्टरांनी इरेक्टाइल डिसफंक्शनच्या औषधाचा वापर केला आहे.
मोनिकाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ही अर्ध्याहून कमी होती. आणि तो सतत पातळी कमी होत होती. इंग्लंडच्या गेन्सबरो लिंकनशायरमध्ये राहणाऱ्या नर्स मोनिकाने सांगितले की,'जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की, माझा जीव व्हायग्रामुळे वाचला.'
सुरुवातीला मला ही गोष्ट मस्करी वाट होती. मात्र खरंच मला व्हायग्राचा हेवी डोस दिला होता. त्यामुळे तिच्या शरीरावर चांगला परिणाम झाला.
मोनिका एनएचएस लिंकनशायरमध्ये कोरोनाबाधितांन उपचार देत होती. तेव्हाच तिला ऑक्टोबर 2021 मध्ये कोरोनाची लागण झाली. तिची हळूहळू तब्बेत बिघडू लागली. रक्ताच्या उल्ट्या देखील झाल्या. त्यानंतर तिला डिस्चार्जही देण्यात आला होता.
नर्सची बिघडलेली प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्यांच्या उपचारासाठी व्हायग्राच वापर केला. वियग्राच्या वापराने रक्त धमण्या सुधारतात. वियाग्रा फुफ्फुसांमध्ये फॉस्फोडीस्टेरेझ एंजाइम तयार करते. रक्तवाहिन्या पसरवून फुफ्फुसांना आराम देण्याचे काम करते.
मोनिका म्हणाली, 'हे व्हायग्रा औषध होते, ज्यामुळे माझे प्राण वाचले. ४८ तासांत माझी फुफ्फुस काम करू लागली. मला दमा आहे, त्यामुळे माझी ऑक्सिजनची पातळी कमी होत होती. मोनिका आता पूर्वीपेक्षा बरी असून तिच्यावर घरी उपचार सुरू आहेत.