टेंगो : आतापर्यंत तुम्ही डोंगरामध्ये किंवा अचानक ज्वालामुखी उसळल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असतील. आतापर्यंत समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक होतो हे फक्त ऐकलं होतं. पण ते पाहायलाही मिळालं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या उद्रेकामुळे समुद्राच्या लाटा इतक्या तीव्र झाल्या आहेत की, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. 2022 च्या पहिल्याच महिन्यात जानेवारीमध्ये इतक्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती.
काहींनी मोठी त्सुनामी आणि जगाचा अंत होण्याच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू होत असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला आहे. न्यूझीलंड आणि आजूबाजूच्या देशांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
टोंगो बेटाजवळ हा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची माहिती मिळाली आहे. तिथल्या आजूबाजूच्या लोकांना सुखरुप ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर फुग्यासारखा मोठा आकार पाण्यावर तयार झाला.
ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना मोठा दाब तयार झाला आणि समुद्रामध्ये वेगानं हालचाली जाणवायला लागल्या. या ज्वालामुखीचा उद्रेक कसा झाला याचे काही सॅटलाईट फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. ही दुर्मीळ दृश्यं आहेत.
Entre vapor de agua, rayos y flujos piroclásticos, esta fue la pesadilla que se vivió en las cercanías del volcán #HungaTongaHungaHaapai después de su gigantesca erupción de ayer. pic.twitter.com/fvRuOYM1YY
— Alejandro S. (@asalmendez) January 14, 2022
— QiFlow (@Qi_Impuls) January 15, 2022