Optical Illusion: फोटोत लपलेली पांढरी मांजर शोधाल तर तुमच्यासारखं बुद्धिमान कोणीच नाही! तुमच्याकडे फक्त 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion: आपल्या मेंदूला चालना देणारे गेम्स आपल्याला कायमच आवडतात. मुळात असे गेम्स आपल्याला थोडं रिलॅक्सही (Brain Game) करतात आणि आपल्यात उर्जाही संचारतात. त्यामुळे आपण असे गेम्स हे फार जास्त शेअर करतो आणि आपल्या जवळच्या मित्रांनाही ते दाखवतो.

Updated: Dec 23, 2022, 09:07 PM IST
Optical Illusion: फोटोत लपलेली पांढरी मांजर शोधाल तर तुमच्यासारखं बुद्धिमान कोणीच नाही! तुमच्याकडे फक्त 10 सेकंदाची वेळ title=
optical illusion

Optical Illusion: आपल्या मेंदूला चालना देणारे गेम्स आपल्याला कायमच आवडतात. मुळात असे गेम्स आपल्याला थोडं रिलॅक्सही (Brain Game) करतात आणि आपल्यात उर्जाही संचारतात. त्यामुळे आपण असे गेम्स हे फार जास्त शेअर करतो आणि आपल्या जवळच्या मित्रांनाही ते दाखवतो. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात तुम्हाला लपलेलं एक पांढरं मांजर शोधायचं आहे. तुमच्यासाठी हा खेळ सोप्पाही असू शकतो आणि कठीणही त्यामुळे यावेळी तुम्हाला एका फोटोत (Cat hidden in jungle) लपलेलं एक मांजर शोधायचं आहे. हे मांजर एका घनदाट जंगलात लपलेलं आहे. शोधण्यासाठी तुमच्याकडे आहे फक्त 10 सेकंदाची वेळ, शोधाल तर तुमच्यासारखं जिनियस कोणी नाही. भल्या भल्यांना याचे उत्तर शोधता आलेलं नाही तुम्ही शोधू शकता का चला पाहूया? (optical illusion find white cat in 10 seconds you will called genius)

सध्या एका जंगलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अनेकांना असा प्रश्न पडतोय की या फोटो असं आहे तरी काय? परंतु थांबा या फोटोत एक मांजर लपलेली आहे. ही मांजर तुम्हाला काही सेकंदातच शोधून काढायची आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोत मांजर कुठल्यातरी गुप्त जागी लपलेली आहे. शोधा शोधा, ही मांजर (white cat) शोधून शोधून तुम्ही नक्कीच थकाल. या फोटोत तुम्ही पाहू शकता की आजूबाजूला घनदाट झाडी आहेत आणि त्यात कुठेतरी मांजर लपलेली आहे. समोर एक मोकळा भाग दिसतो आहे आणि त्या जमिनीवर गवताचे साम्राज्य पसरलं आहे. येथे कुठेतरी मध्यमागी एक छोटी शिडीही ठेवली आहे. 

अजून नाही सापडली, होय, तुम्हाला सापडली ना, त्या फोटोत झुडूपांमध्ये काहीतरी पांढरं दिसतंय. चला आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. ही पांढरीशुभ्र मांजर घनदाट झाडांच्या अंधारात लपलेली आहे. तुमचे डोळे आणि शोधवृत्ती व निरिक्षण यांवर जरा जोर द्यावा लागेल. मग त्या झुडूपांमध्ये लपलेली ती मांजर तुम्हाला नक्कीच सापडेल. अजून नाही सापडली. ठीक आहे. आता आम्ही तुम्हाला या फोटोचं खरं उत्तर सांगतो. अहो, मांजर अगदी तुमच्या डोळ्यांसमोर आहे. नाही कळलं? चला पाहूया कुठे?  

काय आहे खरं उत्तर?

त्या दाट काळ्या अंधारातील झुडूपांमध्ये लपलेली पांढरी मांजर कदाचित तुम्हाला सहजी दिसणार नाही. त्यामुळे ते ओळखणं कठीण होतं. ही मांजर जमिनीवर पडलेल्या झाडाच्या मागे झुडूपात लपली आहे.