कोरोनाच्या रुग्णांवर असा ही होतोय परिणाम, संशोधनात आलं पुढे

कोरोनाचा शरीरावर आणखी एक गंभीर परिणाम...

Updated: Oct 15, 2020, 09:34 AM IST
कोरोनाच्या रुग्णांवर असा ही होतोय परिणाम, संशोधनात आलं पुढे

लंडन : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे काही रूग्णांमध्ये अचानक ऐकण्याबाबत समस्या कायम राहिल्याची नोंद झाली आहे. यासंदर्भात ब्रिटनमध्ये झालेल्या अभ्यासात हे वृत्त समोर आले आहे. पण कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कर्णबधिर झाले अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे.

यूकेमधील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, 'कोरोनाच्या संसर्गामुळे बहिरेपणाच्या समस्येविषयी जागरूकता घेणे खूप महत्वाचे आहे, कारण स्टिरॉइड्स बरोबर योग्य उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.' ते म्हणाले की याचे कारण स्पष्ट नाही, परंतु फ्लूसारख्या व्हायरल इन्फेक्शननंतरही अशीच समस्या उद्भवते.

'बीएमजे केस रिपोर्ट्स' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनात दम्याचा एक रुग्ण असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीचा उल्लेख आहे. कोरोना विषाणूची जबरदस्त लागण झाल्यानंतर, त्याची ऐकण्याची क्षमता अचानक नष्ट झाली.

संसर्गापूर्वी या व्यक्तीस ऐकण्याची इतर कोणतीही समस्या नव्हती. त्या व्यक्तीला स्टिरॉइड गोळ्या आणि लस देण्यात आल्या, त्यानंतर त्याची ऐकण्याची क्षमता काही प्रमाणात परत आली.

संशोधकांनी एका अभ्यासात म्हटले आहे की, 'मोठ्या संख्येने लोकांना संसर्ग झाल्यामुळे बहिरेपणाच्या समस्येवर उपाय म्हणून पुढील संशोधन करण्याची गरज आहे जेणेकरुन ही समस्या शोधून त्यावर उपचार करता येतील.'