Video : पाकिस्तानात भारतीय कुटुंबाने अज्ञात व्यक्तीकडून घेतली लिफ्ट, पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का...

Biryani Feast : एक भारतीय कुटुंब (Indian family) पाकिस्तानमध्ये गेलं आणि तिथे त्यांनी अज्ञान व्यक्तीला लिफ्ट मागितली. त्यानंतर या भारतीयाला जी वागणूक देण्यात आली त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video on social media) होतो आहे. 

Updated: Nov 13, 2022, 10:40 AM IST

Pakistan_Biryani_Trending

Pakistan Biryani Feast Trending Video : जेव्हा आपण परदेशात फिरायला जातो तेव्हा आपण कायम टेन्शनमध्ये असतो. तिथे आपल्यासोबत काही फसवणूक तर होणार नाही ना, परदेशातील भाषा आपल्याला येतं नसते अशावेळी आपल्यासोबत काही धोका तर नाही ना होणार. असे अनेक गोष्टींचं आपल्याला टेन्शन येतं. त्यात जर आपण पाकिस्तान (Pakistan ) आपल्या एकेकाळच्या शत्रूच्या देशात आपण फिरायला गेलो तर...अशावेळी काय होणार...असंच एक भारतीय कुटुंब (Indian family) पाकिस्तानमध्ये गेलं आणि तिथे त्यांनी अज्ञान व्यक्तीला लिफ्ट मागितली. त्यानंतर या भारतीयाला जी वागणूक देण्यात आली त्यानंतर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video on social media) होतो आहे. 

हे ही वाचा - Viral: फ्लाइंग वडापाव तुम्ही कधी पाहिला आहे का? Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

सीमेपलीकडील प्रेम!

Pakistan Viral Video :  हैद्रराबादमधील एक भारतीय कुटुंब मुलीच्या टूर्नामेंटसाठी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये पोहोचला. या कुटुंबाला भारताची सीमा ओलांडताना भीती वाटतं होती. प्रवास सुरु झाला एका क्षणाला या कुटुंबाला अज्ञात व्यक्तीकडून लिफ्ट घ्यावी लागली. त्यावेळी या पाकिस्तानी व्यक्तीने या भारतीय कुटुंबाला जी वागणूक दिली. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र याचीच चर्चा आहे. 

हेही वाचा - Viral Video : ती किचनमध्ये करत होती काम, तो आला तिला मिठीत घेतलं आणि... 

नमस्कार भाऊ...तुम्ही आमचे पाहुणे आहात!

सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्म व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी ड्रायव्हर या कुटुंबाला लिफ्ट देतं. आणि यावेळी त्यांना म्हणतं तुमचं पाकिस्तानमध्ये स्वागत आहे. जेव्हा या कुटुंबाने सांगितलं ते हैदराबादचे आहेत. तर या ड्रायव्हरने त्यांना मेजवानीसाठी आमंत्रण दिलं. तुमची हैदराबादी बिर्याणी (Hyderabadi Biryani)प्रसिद्ध आहेत तर आता आमची बिर्याणी आणि पुलाव पण खाऊन बघा.  (Pakistan Biryani Feast Trending Video viral on social media nmp)

खीर आणि गुलाबजामची मेजवानी

या पाकिस्तान ड्रायव्हरने या कुटुंबाच्या आवभगत करताना सांगितलं की, हैदराबादी बिर्याणीची प्रेरणा घेत इथेही हैदराबादी बिर्याणीची विक्री करतो असं, ते म्हणाले. हा व्हिडीओ ट्विटरवर खूप मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. 

विराट कोहलीला आम्हाला द्या...

या व्हिडीओमध्ये भारतीय आणि पाकिस्तान लोकांमधील संभाषण अनेकांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका वेळी पाकिस्तानी व्यक्ती गंमतीत म्हणतो की, विराट कोहलीला (Virat Kohli) आम्हाला द्या तुम्ही ट्राफी घेऊन जा. आज टी20 वर्ल्डकप फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लड आमनेसामने (T20 World Cup 2022 Final, PAK vs ENG) येणार आहेत. अशात हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. पाकिस्तान आणि भारतातमधील नातं चांगलं नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. पण हा व्हिडीओ प्रत्येक भारतीय आणि पाकिस्तानमधील लोकांनी पाहावा असा आहे. सीमेपलिकडील प्रेम, जे धर्म, जात, रंग या सगळ्याच्या पलिकडलं आहे. हा व्हिडीओ भारतीयांची मनं जिंकत आहे. आपल्याकडे अतिथी देवा भव असं म्हटलं जातं. बस्स मग पाकिस्तानातही भारतायचं स्वागत पाहून सगळे अवाक् झाले आहेत.