जुगार खेळणाऱ्या गाढवाची जामिनावर सुटका; न्यायालयाने मंजूर केला जामीन

आठ जणांसोबत गाढवाला देखील अटक 

Updated: Jun 13, 2020, 03:25 PM IST
जुगार खेळणाऱ्या गाढवाची जामिनावर सुटका; न्यायालयाने मंजूर केला जामीन  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा फटका पाकिस्तानला देखील बसला आहे. याच पाकिस्तानमध्ये एका गाढवाला चक्क जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रहीम यार खान या परिसरात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला ताब्यात घेतलं आहे. एवढंच नव्हे तर या गाढवासोबत आठ संशयितांना अटक केलं आहे. या गाढवाच्या नावे तक्रार दाखल केली आहे. 

या प्रकरणात आरोपाखाली ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांना एका दिवसांत जामीन मिळाला. मात्र गाढवाला ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आली. जुगार खेळणाऱ्यांनी अटक केलेल्या गाढवावर सट्टा लावला होता. 

४० सेकंदात हे गाढव ६०० मीटर धावू शकते का? यावर हा सट्टा लावण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या अड्ड्यावर छापा मारला. गाढवासह अनेक जण पोलीस ठाण्यात पोहोचले. 

या प्रकरणात पोलिसांनी गाढवाला देखील अटक केले. गाढवला अटक केल्याचं माध्यमांना कळताच नेमकं गाढव कोण आहे? हे शोधण्यासाठी सगळेजण पोलीस स्थानकात पोहोचले. गाढवाला अटक केल्याची बातमी जगभरात पोहोचली आणि पाकिस्तानी पोलिसांवर सगळेजण हसायला लागले. 

पोलिसांनी या गाढवाला एका ठिकाणी बांधून ठेवलं होतं. गाढवाचा मालक गुलाम मुस्तफा याला गाढवाचा ताबा द्यावा असे निर्देश न्यायालयाने देत गाढवाला जामीन मंजूर केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात गाढवाचेही एफआयआरमध्ये नाव होते. यामुळे पोलीस ठाण्याच्या बाहेर गाढवाला बांधण्यात आले. तसेच जुगार खेळणाऱ्यांकडून ८ जणांकडून १ लाख २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.