इस्लामाबाद : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पक्षाची संपूर्ण धुळधाण झाली आहे. त्याच्या अल्लाह हू अकबर तहरीक या पक्षाला आतापर्यंत एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही. पाकिस्तान जनतेने दहशतवाद्यांना नाकारल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानात उलटा खेळ, इम्रान खानसाठी लष्कराची खेळी!
Lashkar-e-Taiba chief and Mumbai 26/11 attacks mastermind Hafiz Saeed casts his vote at a polling booth in Lahore. #PakistanElections2018 pic.twitter.com/nKdXt3kQZA
— ANI (@ANI) July 25, 2018
निवडणूक निकाल : इम्रान खान पार्टीची पाकिस्तानात सत्ता येणार?
पाकिस्तानमध्ये आज झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. पाकिस्तानात ११ वी सार्वजनिक निवडणूक झाली. २७२ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. मतदानानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल हे इम्रान खानच्या पार्टीच्या बाजुने लागलेत. इम्रानच्या पक्षाने ७३ जागांची आघाडी घेतली आहे.
आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग, नवाज गट हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता असून बिलावल भुत्तोंचा पीपीपी तिसऱ्या स्थानी राहण्याचा अंदाज आहे. आताचा कल कायम राहिल्यास इम्रान खान यांना पंतप्रधान होण्याची मोठी संधी निर्माण झालीये.
#PakistanGeneralElections: According to ARY news, Imran Khan’s PTI is leading in trends pic.twitter.com/EB3z3jbgmU
— ANI (@ANI) July 25, 2018
इम्रान खानचा राजकीय पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ७३ जागा मिळवून हा सध्या एक नंबरवर आहे. तर नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लीम लीग ही पार्टी दोन नंबर असून ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर बिलावल भुत्तो यांची पार्टीने २६ जागांवर आघाडी घेत तीन नंबरवर आहे. दरम्यान, अन्य ६१ जागांवर आघाडीवर आहे. तर दहशतवादी हाफीस सईद याच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.