Coronaviurs: पाकिस्तानामध्ये हिंदू-ख्रिश्चनांशी दुजाभाव; अन्नधान्य देण्यास अधिकाऱ्यांचा नकार

सरकारी अधिकाऱ्यांकडून इतरांना रेशनचे धान्य दिले जाते. आम्हाला अन्नधान्य पुरवले जात नाही.

Updated: Apr 1, 2020, 12:52 PM IST
Coronaviurs: पाकिस्तानामध्ये हिंदू-ख्रिश्चनांशी दुजाभाव; अन्नधान्य देण्यास अधिकाऱ्यांचा नकार  title=

लाहोर: कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग एकटवत असताना पाकिस्तान मात्र काही केल्या सुधरायला तयार नाही. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू आणि ख्रिश्चन लोकांना साधे रेशनचे धान्यही नाकारले जात आहे. ही व्यथा मांडणाऱ्या एका हिंदू व्यक्तीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओत, हा व्यक्ती पाकिस्तानी अधिकारी आम्हाला अन्नधान्य पुरवत नसल्याचे सांगत आहे. 

कोरोनाचे जगभरात २४ तासांत ४,३०० हून अधिक बळी

पाकिस्तानी यंत्रणांनी आमचीही काळजी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे इतर नागरिकांना सहकार्य केले जाते त्याप्रमाणे आम्हालाही मदत करायला पाहिजे. आम्हालाही लहान मुले आहेत, आम्हीदेखील गरीब आहोत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून इतरांना रेशनचे धान्य दिले जाते. आम्हाला अन्नधान्य पुरवले जात नाही. ही गोष्ट अयोग्य आहे. कोरोना ही संपूर्ण जगावर आलेली आपत्ती आहे. अशावेळी हिंदू किंवा मुस्लिम असा भेद करून चालणार नाही. मात्र, सिंध प्रांतात हिंदू आणि ख्रिश्चनांना कोणीही सहकार्य करायला तयार नाही, असे या व्यक्तीने सांगितले. 

Coronaviurs: 'भारतात अमेरिकेइतकी भयानक परिस्थिती उद्भवणार नाही'

पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे १,८६५ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सिंध प्रांतात सर्वाधिक ६२७, खैबर-पख्तुनवा परिसरात २२१, बलुचिस्तानमध्ये १५३, गिलगिट-बाल्टिस्टानमध्ये १४८, इस्लामाबादमध्ये सहा आणि पाकव्याप्त काश्मीरमधील सहा जणांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे २५ पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.