पाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा फेटाळला

पाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा  फेटाळला आहे. आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव  वाढत असतानाही पाकिस्ताननं आपला हेका कायम ठेवला आहे.

Updated: Sep 6, 2017, 11:50 AM IST
पाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा फेटाळला

नवी दिल्ली : पाकिस्तानने ब्रिक्सचा जाहीरनामा  फेटाळला आहे. आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दहशतवादी गटांवर कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय दबाव  वाढत असतानाही पाकिस्ताननं आपला हेका कायम ठेवला आहे.

चीनच्या शीयामेन  शहरात सोमवारी ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांची शिखर परिषद पार पडली. यात सर्व प्रकारच्या दहशतवादाची निंदा करणारा ४३ पानी जाहीरनामा जारी करण्यात आला. यात पाकिस्तानसह अन्य देशांमधील दहशतवादी गटांपासून असलेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली गेली.

तालिबान, आयसीस, अल-कायदा, पूर्व तूर्कस्तान, उझबेकिस्तानमधील इस्लामी चळवळ तसेच हक्कानी नेटवर्क, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, तेहरिक-तालिबान पाकिस्तान, हिज्ब-उल-तहरीर या अतिरेकी संघटनांनी चालवलेलेल्या हिंसाचारामुळे उपखंडातील सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचा उल्लेखही करण्यात आला. मात्र पाकिस्तानने अफगाणीस्तानकडे बोट दाखवत दहशतवादी गटांसाठी अफगाणिस्तानला जबाबदार धरले. काही गट देश सोडून गेलेत त्यांचा अपवाद वगळता आम्ही सर्व दहशतवादी गटांवर कारवाई केल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x