भारतापेक्षा पाकिस्तानाचे नागरिक अधिक आनंदात

आनंदी देशांच्या यादीत भारत यावर्षी 140 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

Updated: Mar 21, 2019, 03:32 PM IST
भारतापेक्षा पाकिस्तानाचे नागरिक अधिक आनंदात title=

नवी दिल्ली : आनंदी देशांच्या यादीत भारत यावर्षी 140 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षीच्य तुलनेत भारत सात क्रमांकाने मागे गेला आहे. फिनलॅंड सलग दुसऱ्या वर्षी अव्वल राहीला आहे. पण भारत शेजारी राष्ट्र पाकिस्तानपेक्षाही मागे गेला आहे. संयुक्त राष्ट्र विकास समाधान नेटवर्कने बुधवारी यासंदर्भातील अहवाल सादर केला. संयुक्त राष्ट्राने 2012पासून 20 मार्च हा जागतिक आनंदी दिवस म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्रांची ही सूची 6 अटींवर ठरवली जाते. कमाई, जीवनशैली, सामाजिक सहाय्य, आझादी, विश्वास आणि उदारता यांचा यामध्ये समावेश होतो. 

Image result for happy faces india zee news

अहवालानुसार गेल्या काही वर्षांमध्ये सर्व जगभरातील आनंदाचे प्रमाण कमी होत आहे. भारतातील आनंदाचे प्रमाण तर सातत्याने कमी होत आहे. आनंदाच्या बाबतीत भारत 2018 साली 133 व्या स्थानी होता. यावर्षी भारत 140 व्या स्थानी पोहोचला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सातव्या वार्षिक विश्व आनंदी रिपोर्ट हा जगभरातील 156 देशांतील नागरीक स्वत: किती आनंदी समतात यावर आधारीत आहे. चिंता, उदासी आणि क्रोध अशा नकारात्मक भावना वाढल्या आहेत का ? हे देखील यामध्ये पाहण्यात आले आहे.

फिनलॅंड सलग दुसऱ्या वर्षी जगातील आनंदी देश ठरला आहे. यानंतर डेन्मार्क, नार्वे, आइसलॅंड आणि नेदरलॅंड यांचा नंबर लागतो. या रिपोर्टनुसार पाकिस्तान 67 व्या स्थानी, बांगलादेश 125 व्या आणि चीन 93 व्या स्थानी आहे. युद्धग्रस्त (152) व्या स्थानी आहे. जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक असूनही अमेरिका आनंदी देशांच्या यादीत 19 व्या स्थानी आहे.