Viral Video: वाढत्या क्राईमबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पोपटानं केली चोरी, घटना कॅमेऱ्यात चित्रित

 एका रिपोर्टिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ चिलीतील असून पत्रकार वाढत्या गुन्ह्यांबाबत वृत्तांकन करताना दिसत आहे. पण लाईव्ह रिपोर्टिंग (Live Reporting) करतानाच तिथे चोरीची घटना घडते.

Updated: Nov 7, 2022, 05:50 PM IST
Viral Video: वाढत्या क्राईमबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पोपटानं केली चोरी, घटना कॅमेऱ्यात चित्रित title=

Trending Video: इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांचं आयुष्य घड्याळ्याच्या काट्यांवर धावतं. ब्रेकिंग बातम्यांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धावाधाव सुरु असते. स्पर्धात्मक युगात अनेकदा दमछाक होते. पण रिपोर्टर आणि कॅमेरामन आपलं काम तितक्याच चोखपणे बजावतात. असाच एका रिपोर्टिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ चिलीतील असून पत्रकार वाढत्या गुन्ह्यांबाबत वृत्तांकन करताना दिसत आहे. पण लाईव्ह रिपोर्टिंग (Live Reporting) करतानाच तिथे चोरीची घटना घडते. हा संपूर्ण प्रकार लाईव्ह कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. पोपट पत्रकाराच्या कानातला ईअरपॉड काढतो आणि घेऊन पळून जातो. रिपोर्टनुसार चिलीच्या सँटियागोमध्ये मागच्या काही महिन्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंगची प्रकरणं वाढली आहे. यासाठी तिथलं न्यूज चॅनेल असलेल्या 'चिलीविजन'नं यावर प्रकाशझोत टाकला. रिपोर्टरनं आकडेवारी काढत पोलीस प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवलं. यासाठी तो लाईव्ह देत असताना हा प्रकार घडला. 

अँड्रू वॉस लाईव्ह देत असताना एक पोपट त्याच्या खांद्यावर येऊन बसतो. पण जराही न डगमगता वॉस लाईव्ह देतो. रिपोर्टिंग स्पॅनिश भाषेत करत असल्याने तितकसं समजत नाही. मात्र या संधीचा फायदा घेऊन पोपट कानातला ईअरपॉड काढतो आणि घेऊन उडून जातो. हा व्हिडी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. काही क्षणातच पोपट घटनास्थळावरून उडून जातो. 

20 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 5 नोव्हेंबरला शेअर केलेला हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओखाली नेटकरी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका युजर्सनं लिहिलं आहे की, "अरे रे रिपोर्टरसोबत क्राईम घडला. आरोपी डोळ्यासमोरून ईअरपॉड घेऊन गेला." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "पोपटाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली की नाही. आता पोपटाला कसं पकडणार?"