मोराचा 'असा' डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल, पाहा हा प्रसन्न करणारा Video

हा व्हिडीओ पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. 

Updated: Jul 15, 2022, 11:41 AM IST
मोराचा 'असा' डान्स तुम्ही कधी पाहिला नसेल, पाहा हा प्रसन्न करणारा Video  title=

Viral Video - पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. त्यामुळे वातावरणात छान गारवा निर्माण झाला. पावसामुळे निसर्गाचं रुपही खुलून आलं आहे. हे नयनरम्य दृष्य पाहून अनेकांना निसर्गात फिरायला जायची इच्छा होतेय. नदी, डोंगऱ्यात फिरताना एखाद्या मोर दिसला तर मन अगदी प्रसन्न होऊ जातं. मग अशावेळी एकच गाणं आठवतं, 'फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच.'

मोराला तुम्ही प्रत्यक्षात किंवा त्याचे फोटो, व्हिडीओ पाहिले असतील. पण मोराला पिसारा फुलवून नाचताना पाहणं यापेक्षा दुसरा अद्भुत आनंद नाही. मोराला पंख फुलावून नाचताना बघणं हा दुर्मिळ क्षण असतो. सोशल मीडियावर सध्या असाच मोराचा सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. 

व्हिडीओ पाहून होणार मंत्रमुग्ध

या व्हिडीओमध्ये मोर अचानक आपली कंबर मटकत पिसारा फुलवतो. बघता बघता पिसारा इतका मोठा होतो की ते पाहून एक क्षण सगळं विसरायला होतं. मोराचा पिसारा फुलवणारा हा व्हिडीओ पाहून आपण क्षणभर मंत्रमुग्ध होतो. मोर आपल्याला दिसेल पण मोराचा पिसारा फुलवून नृत्य करणे हा क्षण जगात खूप कमी पाहायला मिळतो. 

@buitengebieden या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 7 सेकंदच्या व्हिडीओला आतापर्यंत 1.5 कोटी व्यूज मिळाले आहेत. तर 5 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स पण केले आहेत. एका यूजरने म्हटलं आहे की, ''यापूर्वी इतकं सुंदर नयनरम्य दृष्य पाहिलं नाही.''