मनिला : फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रीगो ड्युटेर्टे यांनी महिलांबाबत अत्यंत संतापजनक विधान केलंय. ड्युटेर्टे यांनी अतिरेक्यांविरोधात देशामध्ये लष्करी राजवट पुकारलीये.
या लष्करी राजवटीचं महत्त्व आपल्या जवानांना पटवून देताना तुम्ही तीन जणींवर बलात्कार केलात तरी त्याची जबाबदारी मी घेईन, असं म्हणत आपल्याच जवानांना बलात्कार करण्यास प्रोत्साहन दिलंय.
शुक्रवारी त्यांनी जखमी जवानांनी विचारपूस केली. यावेळी त्यांनी जवानांसमोर छोटेखानी भाषण केलं. लष्कराची दडपशाही कशी राबवता येईल याचे धडेच ड्युटेर्टे यांनी जवानांना दिले. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या विधानावर जगभरातून टीका झाल्यानंतरही ते आपलं विधान मागे घेण्यास तयार नाहीत.