Lung cancer : कॅन्सर आजार म्हंटल की डोळ्यासमोर फक्त मृत्यूच दिसतो. कॅन्सर सारखा सर्वात घातक आजार आता फक्त एका गोळीने बरा होणार आहे. वैज्ञानिकांनी चमत्कारिक शोध लावला आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगावर वैज्ञानिकांनी औषध शोधले आहे. osimertinib नावाची गोळी फुफ्फुसाच्या कर्करोगावर मात करु शकते असा दावा केला जात आहे. वैज्ञानिकांच्या संशोधनाला यश आले असून फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचार सुरु असताना osimertinib या गोळीचे सेवन केल्यास मृत्यूचा धोका 51 टक्क्यांनी कमी होतो असा दावा देखील संशोधकांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या गोळीचे सेवन करावे अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
येल विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली शिकागो येथील अमेरिकन सोसायटी ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी (एएससीओ) च्या वार्षिक बैठकीत या गोळीच्या संशोधनबाबतची माहिती जाहीर करण्यात आली. ही गोळी फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी वरदान ठरु शकते. जगभरातील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होतात. दरवर्षी सुमारे 1.8 दशलक्ष रुग्णांचा फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो.
येल कॅन्सर सेंटरचे डेप्युटी डायरेक्टर आणि संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. हर्बस्ट यांनी osimertinib या गोळीच्या संशोधनाबाबत माहिती दिली. या गोळीमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगा 50 टक्के नियंत्रण मिळवता येते. 26 देशांतील 30 ते 86 वर्षे वयोगटातील रुग्णांवर या गोळीचे परीक्षण करण्यात आले. हे सर्व फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण होते. त्यांच्यावर या औषधाचा चांगला परिणाम दिसून आल्याचा दावा डॉ. हर्बस्ट यांनी केला आहे.
ही गोळी जगातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या चतुर्थांश रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शिकागो कॅन्सर कॉन्फरन्समध्ये हे औषध ब्रिटन, अमेरिका यांसारख्या जगातील काही मोठ्या देशांमध्ये उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. इतर देशांमध्येही ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. हर्बस्ट यांनी सांगितले.
A mutation in the EGFR gene is found in ~25% of lung cancers. Reported @NEJM and @ASCO today: a pill directed at this mutation cut deaths by 50% through 5 years in a randomized trial following surgical resectionhttps://t.co/XqjSiIWTfd pic.twitter.com/JxtCaFGrMP
— Eric Topol (@EricTopol) June 4, 2023
महिलांसाठी जीवघेणा ठरणा-या याच गर्भाशयाच्या कॅन्सरवर लस तयार करण्यात आली आहे. या लसीमुळे गर्भाशयाचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय तर गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे होणा-या 44 टक्के मृत्यूंमध्ये या लसीमुळे घट होणार असल्याचं संशोधनातून समोर आलंय. सर्व्हावॅक ह्यूमन पॅपिलोम व्हायरस अर्थात HPV लस गर्भाशयाच्या कॅन्सरवर रामबाण उपाय ठरलीय. मॉडर्ना आणि फायजर लस बनवताना जी पद्धत वापरली त्याच धर्तीवर HPV लस तयार करण्यात आली आहे.