पाकिस्तानसमोर दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींचा प्रहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावर आतंरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला आहे.

Updated: Jun 14, 2019, 01:07 PM IST
पाकिस्तानसमोर दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींचा प्रहार title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा दहशतवादाच्या मुद्द्यावर आतंरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवला आहे. बिश्केकमध्ये सुरु असलेल्या शंघाई कॉरपोरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) समिटमध्ये शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, संपूर्ण देशांना दहशतवादा विरोधात एकत्र आलं पाहिजे आणि दहशतवाद कायमचा संपवला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी जेव्हा दहशतवादाचा मुद्दा उचलला तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील समोर बसले होते.

दहशतवादावर आंतरराष्ट्रीय परिषद

पंतप्रधान मोदींनी SCO सदस्यांकडे मागणी केली की, दहशतवादावर एकजूट होण्याची गरज आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद घेतली पाहिजे. पंतप्रधान मोदींनी श्रीलंका आणि मालदीव दौऱ्याचा देखील या दरम्यान उल्लेख केला.

पंतप्रधान मोदींनी श्रीलंकेमधील चर्चमध्ये झालेल्या हल्ल्याचा देखील यावेळी उल्लेख केला. दहशतवादा विरोधात एकत्र आलं पाहिजे. यासाठी सर्व देशांनी या आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभागी व्हावं. असं आवाहन देखील मोदींनी केलं.

दहशतवादामुळे अनेक निरअपराध लोकांनचा जीव जातो. दहशतवादाला मुळापासून उखडून फेकणं गरजेचं आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे.