PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यात ही डील पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणार

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेत ५ मोठा सीईओंची घेतली भेट

Updated: Sep 23, 2021, 11:17 PM IST
PM मोदींच्या अमेरिका दौऱ्यात ही डील पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणार title=

वॉशिंग्टन : पीएम मोदी (PM modi US visit) अमेरिका दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी सकाळी 3.30 वाजता (भारतीय वेळेनुसार) वॉशिंग्टनला पोहोचले. तेथे त्यांचे विमानतळावर अमेरिकन अधिकारी आणि भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी स्वागत केले. भारतीय वंशाचे लोक विमानतळापासून ते हॉटेलपर्यंत तिरंगा घेऊन उभे होते. मोदी-मोदींच्या घोषणा सर्वत्र ऐकू येत होते. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी 5 कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये एक महत्त्वाचे नाव आहे विवेक लाल, अमेरिकेतील जनरल अॅटोमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी. ही एक कंपनी आहे जी ड्रोन तयार करते, ज्याचा वापर समुद्रात शत्रूवर नजर ठेवण्यासाठी केला जातो.

पीएम मोदींनी जनरल अॅटोमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक लाल यांची भेट घेतली. असा अंदाज लावला जात आहे की या काळात ड्रोनच्या वापरासंदर्भात भारतात नवीन संधी खुल्या होतील. भारताची लष्करी क्षमता वाढवण्यासाठी 30 प्रीडेटर ड्रोन घेण्याचा प्रयत्न केला जाईल. हे ड्रोन जनरल अॅटोमिक्स कंपनी बनवतील.

अमेरिकन हवाई दल आणि रॉयल एअर फोर्स 'MQ-9 Reaper' वापरतात. हे प्रीडेटर बी रिमोटली पायलट एअरक्राफ्ट (आरपीए) आहे.

प्रीडेटर ड्रोन जास्तीत जास्त 50,000 फूट उंचीवर 27 तासांपेक्षा जास्त काळ हवेत उडू शकतो. जनरल अॅटोमिक्सच्या मते, ड्रोनचा वापर पाळत ठेवणे आणि टोही मोहिमांमध्ये केला जाऊ शकतो.

यापूर्वीही भारताने प्रीडेटर कराराचा प्रयत्न केला. 2017 मध्ये, जेव्हा नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा भारतीय लष्कराने जनरल अॅटॉमिक्स अॅव्हेंजर यूएव्ही खरेदी करण्यात रस दाखवला होता, पण हा करार होऊ शकला नाही.

पंतप्रधान मोदी 24 सप्टेंबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतील. याशिवाय शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये क्वाड देशांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर मोदी न्यूयॉर्कला रवाना होतील.