पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर, संबंध दृढ करण्यावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्यासाठी चीनच्या वुहान इथं पोहोचलेत. 

पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर, संबंध दृढ करण्यावर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अनौपचारिक दौऱ्यासाठी चीनच्या वुहान इथं पोहोचलेत. मध्य चीनमधल्या या शहरामध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग दोन दिवस सोबत असतील. वुहान हे शहर चीनचे क्रांतिकारी नेते माओ यांचं आवडतं पर्यटनस्थळ असलेलं हे शहर आहे. जिनपिंग भारतात आले असताना पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात त्यांचं अनौपचारिक आदरातिथ्य केलं होतं. जिनपिंग याची परतफेड माओंच्या स्मारकावर करतायत.

दोन्ही देशांचे संबंध दीर्घकालीन चांगले राहावेत, यासाठी या भेटीमध्ये बरीच चर्चा होणार असल्याचं पंतप्रधानांनी चीनला निघण्यापूर्वी सांगितलं. अनेक जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.