नवी दिल्ली : पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचणार आहेत. या देशाची यात्रा करणारे पंतप्रधान मोदी पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी फिलीस्तीनच्या राष्ट्रध्यक्षांची भेट घेणार आहेत.
या दौऱ्याआधी पहिल्या दिवशी पीएम मोदी जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये पोहोचले. आज ऐतिहासिक दौऱ्यासाठी ते फिलीस्तीनला पोहोचतील.
पीएम अम्मान येथून भारतीय वेळेनुसार 1.15 वाजता फिलीस्तीनसाठी रामाल्लाह येथून निघतील. येथे ते फिलीस्तीनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांना भेटतील. त्यानंतर मोदी यासर अराफात म्यूजियममध्ये देखील जातील. पीएम मोदी फिलीस्तीनच्या विकासात भारताच्या सहयोगावर चर्चा करतील.
पीएम मोदी यांच्या स्वागतासाठी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास स्वत: हजर राहणार आहेत. महमूद अब्बास प्रोटोकॉल तोडून पीएम मोदींचं स्वागत करतील.
फिलीस्तीननंतर पीएम मोदी अबु धाबीला रवाना होतील. येथे रविवारी ते भारतीय समुदायाला संबोधित करतील. अबु धाबीमधील पहिल्या मंदिराचं ते उद्घाटन करतील.