पंतप्रधान मोदींनी बॅगेला लावलं कुलूप, त्या बॅगेत नक्की आहे तरी काय?

 मोदींच्या बॅगेत नक्की काय आहे? 

Updated: Sep 23, 2021, 11:02 AM IST
पंतप्रधान मोदींनी बॅगेला लावलं कुलूप, त्या बॅगेत नक्की आहे तरी काय?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारतीय वेळेनुसार ते बुधवारी सकाळी 3.30 वाजता वॉशिंग्टनला पोहोचले. पंतप्रधानांनी त्यांच्या हवाई प्रवासाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जो खूप व्हायरल होत आहे. फोटोमध्ये मोदी ज्या विमानातून प्रवास करत आहेत, त्या विमानातील  परिस्थिती नक्की कशी आहे, ते दिसत आहे.  फोटोंमध्ये एक बॅग आहे. त्या बॅगेला कुलूप लावलं आहे. त्यामुळे मोदींच्या बॅगेत नक्की काय आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रवासादरम्यान  फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ते विमानाच्या आत काही काम करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत मोदींनी  लिहिले आहे की, 'उंच झेप म्हणजे काही महत्त्वाचे काम करण्याची संधी.' सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत असल्यामुळे मोदींच्या बॅगेकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान मोदी अमेरिका दौऱ्यावर असल्यामुळे अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्यची माहिती मिळत आहे. 

पंतप्रधानांची ही भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आमंत्रणावर होत आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी विमानात बसले आहेत. तेथे ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतील, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जागतिक नेत्यांशी चर्चा करतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला (UNGA) संबोधित करतील.