Tina Turner Became Budhhist: कुठल्याही कलाकाराचे आयुष्य हे सोप्पं नाही. मग हे कलाकार कुठल्याही काळातले असोत. त्यांना वेगवेगळ्या दिव्यातून, संघर्षातून जावेच लागते. त्यामुळे त्यांचे आयुष्यही काही सोप्पे नसते. अनेक कलाकारांची शोकांतिका ही आपण ऐकलीच असेल. हॉलिवूडच्या या गायिकेचेही आयुष्य काही सोप्पे नव्हते. ज्येष्ठ हॉलिवूडच्या गायिका टीना टर्नर (Tina Turner Death) यांचे नुकतेच वयाच्या 83 व्या निधन झाले होते. त्यामुळे त्यांना संपुर्ण जगभरातील चाहत्यांकडून, कलाकारांकडून आणि प्रेक्षकांकडून श्रद्धाजंली वाहण्यात आली आहे.
भारतीय कलाकारांनीही त्यांना श्रद्धाजंली वाहिली आहे. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे टीना टर्नर यांचे आयुष्य काही सोप्पं नव्हतं. त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यातही अनेक खाचखळगे आले होते. त्यांच्याबद्दल अनेकदा लिहिले आणि बोलले गेले आहे. त्यामुळे त्यांची चर्चा ही तेव्हाही झाली आणि आताही अनेकदा (Arbaaz Khan on Tina Turner) होताना दिसते. आताही अनेकदा त्यांची चर्चा ही होताना दिसते आहे.
आपल्या वैवाहिक जीवनातून शांतता मिळवण्यासाठी त्यांनी बुद्ध धर्म स्विकारला होता असे रिपोर्ट्समधून कळते. 60 आणि 80 च्या दशकात या लोकप्रिय गायिकेनं हॉलिवूडच्या अनेक गाणी गायली आहेत. त्यांचा जन्म हा 26 नोव्हेंबर 1939 साली झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1950 च्या दशकात केली होती.
त्यांनी आपले पहिले गाणं हे 1957 साली रेकॉर्ड केले होते. 'अ फूल इन लव्ह' या गाण्यानं त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली होती. हे गाणं 1960 साली प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर त्यांची अनेक लोकप्रिय गाणी आली होती. एका चित्रपटाच्या निमित्तानं त्या 2004 साली भारतात आल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, येथे आल्यावर असं वाटतंय की माझं आयुष्यच बदलून गेले आहे. ज्या चित्रपटाच्या निमित्तानं त्या भारतात आल्या होत्या तो चित्रपट दिग्दर्शकाच्या निधनानं होऊ शकला नाही. त्यावेळी त्या भारतातील अनेक हिंदू आणि बौद्ध धार्मिक स्थळी गेल्या होत्या.
हेही वाचा - भर कार्यक्रमात कुणावर संतापले लोकप्रिय गायक कैलाश खेर, ओरडत म्हणाले, ''थोडीशी तरी लाज...''
समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, आपल्या दु:खी वैवाहिक आयुष्याला कंटाळून त्यांनी हा धर्म स्वीकारला होता. त्या आपल्या अल्बममधून बौद्ध मंत्रही बोलायच्या. त्यांनी स्विझर्लेंडमध्ये एक बौद्ध मंदिर बांधले होते. टीना टर्नर या आपल्या वैयक्तिक वैवाहिक जीवनाशी नाकुष होत्या. त्यांना यातून सुटका हवी होती आणि काहीतरी वेगळं करायचे होते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील हा एक वेगळा टप्पा ठरला आणि यामुळेच त्यांचा जीव वाचला असं त्या म्हणतात.