Pakistan Blackout : पाकिस्तानची आर्थिक स्थिती पार बिघडून गेली आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानवर दात कोरून पोट भरण्याची वेळ आली असं म्हणण्याची वेल आलेय. महागाई आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेमुळं पाकिस्तानचं कंबरडं एवढं मोडून पडलंय की, वीज वाचवण्यासाठी बाजारपेठा, मॉल, मॅरेज हॉलमधील वीज बंद करण्याची वेळ आली आहे. यामुळे पाकिस्तान अंधारात बुडाला आहे.
केवळ वीजच नाही, तर लोकांना स्वयंपाकाचा गॅस मिळणं देखील पाकिस्तानला मुश्कील झाल आहे. इम्रान खान सरकारच्या काळातच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला होता. विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही अर्थव्यवस्था सांभाळणं अवघड होत चालल आहे. एकीकडं चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली पाकिस्तान दबला गेला आहे. तर, दुसरीकडं साधी वीज पुरवतानाही शरीफ सरकारच्या तोंडाला फेस आला आहे. महागाईच्या चक्रात पाकिस्तान चांगलाच भरडून निघाला आहे.
काय आहे नेमकी पाकिस्तानची परिस्थिती
कर्मचाऱ्यांना वीज वाचवण्याचे फर्मान