Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानसाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला. एकामागोमाग एक तीन भूकंपाच्या धक्क्याने अफगाणिस्तान (Afghanistan) हादरला. यात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अनेकजण जखमी झालेत. तात्काळ बचतकार्य (Resque Operation) सुरु करण्यात आलं असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानमध्ये पहिला भूकंप (Earthquake) दुपारी 12.11 वाजता जाणवला, याची तिव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. तर काही वेळातच म्हणजे दुपारी 12.19 मिनिटांनी दुसरा भूकंप आला. याची तीव्रता 5.6 इतकी होती. तर दुपारी 12.42 मिनिटांनी तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जावणला. पहिला दोन भूकंपापक्षा याची तिव्रता जास्त होती. 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद करण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिमी अफगाणिस्तानमधील प्रमुख शर असलेल्या हेरातपासून 40 किलोमीटरवर सांगण्यात आला.
अफगाणिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार भूंकपात मोठी वित्तहानी झाली असून अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात. ढिगाऱ्याखाली अनेक लोकं अडकेले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत असून 15 लोकांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूंकपाचा केंद्रबिंदू असलेल्या हेरातमधल्या जिंदा जान जिल्ह्यातल्या तीन गावांमध्ये मृतांची संख्या जास्त आहे. तर 40 हून अधिक जण जखमी आहेत. फराह आणि बदगीस प्रांताही भूकंपाचे धक्के जाणवले असून काही प्रमाणात नुकसान झालं आहे.
भूकंप का येतात?
पृथ्वीच्या भूगर्भात सातत्याने काही नाही का हालचाली होत असतात. पृथ्वीच्या भूगर्भातील रचना ही प्लेट्सच्या स्वरुपात असते ज्या सातत्याने एकमेकांवर आदळत असतात. या प्रक्रियेमुळे हजारो छोटे मोठे भूकंप होत असतात. या प्लेस्ट एकमेकांवर आदळल्यानंतर जी उर्जा निर्माण होते त्याला भूकंप म्हणतात. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर (richter scale) 6.2 इतकी आहे. स्केलच्या श्रेणीनुसार, हा हादरा मध्यमपेक्षा जास्त मानला जाऊ शकतो.
जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप
पृथ्वीला आदळणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली भूकंपाची (A powerful earthquake)तीव्रता 9.5 इतकी नोंदवण्यात आली आहे. 22 मे 1960 रोजी चिलीमध्ये (Chile earthquake) हा भूकंप झाला होता. 30 सप्टेंबर 1993 ला महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप जावणला होता आणि काही सेकंदातच होत्याचं नव्हतं झालं होतं. 52 खेडेगावातील तीस हजारांच्या आसपास घरं कायमची नष्ट झाली होती. तर आठ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.