झाडाला कधी पैसे लागतात का? याला ते सत्य कळलंच नाही अखेर अशी झाली तरुणाची फजेती

 पैसा हा झाडाला लागत नाही, ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला फक्त मेहनतीनेच मिळते.

Updated: Jan 5, 2022, 09:26 PM IST
झाडाला कधी पैसे लागतात का? याला ते सत्य कळलंच नाही अखेर अशी झाली तरुणाची फजेती title=

मुंबई : आपल्याला नेहमीच सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ पाहायला मिळतात. आपल्याला येथे हवा तो कंटेन्ट पाहायला मिळतो, जसे की, जेवण, सायन्स, आर्ट इत्यादी यासगळ्यात आपल्याला मनोरंजक व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही हे नक्की. हा एका तरुणाचा व्हिडीओ आहे, ज्याची दुसऱ्या तरुणाने फसवणूक केली आहे.

आपल्याला हे माहित आहे की पैसा हा झाडाला लागत नाही, ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला फक्त मेहनतीनेच मिळते. परंतु या व्हिडीओमधील तरुणाला ही गोष्ट लक्षातच आली नाही आणि त्यानं जो मुर्ख पणा केला, ज्याची शिक्षा त्याला भोगावी लागलीच.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगा अचानक झाडाजवळ जातो आणि तो झाड जोरात हलवतो. जेव्हा मुलगा असे करतो तेव्हा झाडातून खूप नोटा खाली पडतात. ज्या घेऊन तो तेथून निघून जातो.

हा सगळा प्रकार रस्त्यावरुन जाणारा दुसरा तरुण पाहत असतो आणि पैसे मिळवण्यासाठी तो देखील पहिल्या तरुणाची नक्कल करतो आणि झाडं हलवतो. परंतु झाडावरुन पैसे खाली न पडता काही भलतीच गोष्ट खाली पडते, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

हा दुसरा तरुण जेव्हा झाड हलवतो तेव्हा पैशांच्या बदल्यात त्याच्यावर पाणी पडतं आणि या तरुणाचा फजेती होते.

हा खरंतर एक प्रँक व्हिडीओ आहे, जेथे काही लोकं मिळून रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मज्जा घेत असतात. या घडटनेला हा तरुण बळी पडला आणि त्यानं स्वत:चं हास्य करुन घेतलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ नेटीझन्सना फार आवडला आहे. हा व्हिडीओ किती व्हायरल होत आहे, याचा अंदाज त्याला मिळत असलेल्या व्ह्यूजवरून लावता येतो. व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळण्यासोबतच लाखो लाईक्सही मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले, 'किती जबरदस्त प्रँक.' दुसऱ्या यूजरने लिहिले, 'म्हणूनच म्हणतात की लोभ वाईट आहे.'