India-China : या आठवड्यात पुन्हा चर्चा, इतर भागातुनही सैन्य मागे हटणार

 पॅनगॉंगमधून सैन्य मागे घेण्याचे मान्य

Updated: Mar 22, 2021, 09:19 AM IST
India-China : या आठवड्यात पुन्हा चर्चा, इतर भागातुनही सैन्य मागे हटणार  title=

नवी दिल्ली : सीमा विवाद (Border Dispute) पूर्णपणे सोडविण्यासाठी भारत आणि चीन (India and China)पुन्हा एकदा बैठक घेणार आहेत. या आठवड्यात दोन्ही देशांमधील कमांडर स्तरावरील (Commander Level Talks) चर्चा अपेक्षित आहे. पॅनोंग लेक (Pangong Lake Area) एरियापासून दोन्ही देशांचे सैन्य मागे आले आहे. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर पॅनगॉंगमधून सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. आगामी बैठकीत आणखी काही क्षेत्रांवर सहमती बनू शकते असं मानलं जातंय.

या क्षेत्रांवर चर्चा

कमांडर स्तरावरील चर्चेत गोगरा हाइट्स आणि डेप्संग (Gogra Heights and Depsang Plains) मैदानी भागातील विस्थापन यावर चर्चा केली जाईल. या आठवड्यात दोन्ही देशांमध्ये बैठक होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही बाजू सीमा विवाद सोडविण्यास तयार आहेत आणि कमांडर स्तरावरील चर्चेत सैन्य मागे घेण्याबाबतच्या करारावर सहमती होऊ शकते. दोन्ही बाजूंनी गोगरा हाइट्स, डेप्संग प्लेस आणि डेमचोक जवळील सीएनसी जंक्शन भागातील विस्थापनाच्या मुद्यावर चर्चा होऊ शकेल असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

अजित डोभाल यांचे कौतुक

गलवान व्हॅलीच्या हिंसाचारानंतर भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. तथापि, पांगोंग लेक परिसरातून सैन्याने माघार घेतल्यामुळे संबंधातील तणाव थोडा कमी झालाय. दोन्ही सैन्याने वादग्रस्त पांगोंग लेक परिसरातून आपले सैन्य मागे घेतले आहे. सेना प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे (M M Naravane)यांनी दोन्ही बाजूंना याचे श्रेय दिले आहे.

चीनची वृत्ती नरम 

भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या अनेक फैरी झाल्या. सुरुवातीला हट्टी चिनी स्थितीमुळे हालचाली होत नव्हत्या, परंतु भारताने केलेल्या कारवाईनंतर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या दबावामुळे चीनच्या भूमिकेमध्ये थोडा नरमपणा आला. चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. अजूनही बर्‍याच भागात वाद आहे. पुढची कमांडर स्तरावरील चर्चा खूप महत्वाची मानली जात आहेत.