पाकिस्तानवरुन निघालं पंतप्रधान मोदींचं विमान, याआधी नाकारली होती परवानगी

जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तीन वेळा परदेशी प्रवासासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती.

Updated: Sep 22, 2021, 06:06 PM IST
पाकिस्तानवरुन निघालं पंतप्रधान मोदींचं विमान, याआधी नाकारली होती परवानगी title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिकेला रवाना झाले. या दरम्यान, अमेरिकेसाठी त्यांचे नॉन-स्टॉप फ्लाइट अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राला बायपास करण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून निघाळे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हवाई हद्दीच्या वापराबाबत पाकिस्तानकडून परवानगी मागितली होती. इस्लामाबादने या उड्डाणाला मंजुरी दिली.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, एका सूत्राने सांगितले की, "पाकिस्तानने भारताला आपले हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी दिली आहे." यापूर्वी पाकिस्तानने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांच्या विमानाला 2019 मध्ये जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तीन वेळा परदेशी प्रवासासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाकारली होती.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने 2019 मध्ये एका निवेदनात म्हटले होते की, "काश्मीरमधील परिस्थिती आणि भारताची वागणूक तसेच या क्षेत्रातील मानवाधिकारांचे उल्लंघन पाहता, आम्ही भारतीय पंतप्रधानांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आम्ही हा निर्णय भारतीय उच्चायुक्तांना कळवला आहे.'

अफगाणिस्तानमधील सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारत सरकारने आपल्या विमानांना अफगाणिस्तानावरील हवाई क्षेत्र टाळण्याचा सल्ला दिला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींसह अमेरिकेला जात आहे.

अमेरिकेला जाण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले की, ते या दौऱ्याचा समारोप न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत करणार आहेत. जेथे वैश्विक आव्हानं, कोविड-19 महामारी, दहशवतादी, जलवायु परिवर्तन आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर संबोधित करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष जो बाय़डेन यांची ही भेट घेणार आहेत. ते जगातील इतर नेत्यांसोबत देखील चर्चा करणार आहेत.

पंतप्रधानांची ही भेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आमंत्रणावर होत आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी विमानात बसले आहेत. तेथे ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतील, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह जागतिक नेत्यांशी चर्चा करतील आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला (UNGA) संबोधित करतील.