पंतप्रधान मोदींची योग डिप्लोमसी, युएन मुख्यालयाबाहेर विश्वयोगदिन... अमेरिकेतून ग्लोबल संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या  तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भारतीयांना संबोधित केलं

Updated: Jun 21, 2023, 06:48 PM IST
पंतप्रधान मोदींची योग डिप्लोमसी, युएन मुख्यालयाबाहेर विश्वयोगदिन... अमेरिकेतून ग्लोबल संदेश title=

PM Modi : जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा केला जातोय. त्यानिमित्ताने देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय...पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या  तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. योग दिनानिमित्त पंतप्रधानांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून भारतीयांना संबोधित केलं. पीएम मोदी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. आता नऊ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी यांनी न्यूयॉर्कमधील यूएन कॉम्प्लेक्सच्या नॉर्थ लॉनमध्ये योग करणार आहेत. यानंतर ते बुधवारी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेणार आहेत. 

जवळपास 180 देशांचे प्रतिनिधीही योग दिनात सहभागी होणार आहेत. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड टिफनी गेरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पोहचले आहेत. संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केजही यात सहभागी होणार असून मी येथे येण्यासाठी खूप उत्साहित आहे. हजारो लोक इथे आले आहेत. आज मी पंतप्रधान मोदींना फॉलो करेन आणि इथे योगा करेन असं त्यांनी म्हटलं आहे. 

योगावर कॉपीराईट नाही
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाबाहेर भाषण केलं. जगभरातील सर्व देशातील लोकं इथे उपस्थित आहेत. 9 वर्षांपूर्वी आम्ही योग दिवस सुरु केला. योगाचा अर्थ हा सर्वांना एकजूट करणं हा आहे. योग हा भारतातून आला असून जुनी परंपरा आहे. यावर कोणाचाही कॉपीराईट नाही. योग हा सर्वांसाठी आहे, योग हा आयुष्याचा भाग आहे असं यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. भाषणानंतर पंतप्रधान मोदी हे सर्वांसोबत योग सुरु केला. पीएम मोदी यांच्या बाजूला प्रसिद्ध अभिनेते रिचर्ड गॅरी बसले होते. ओमचा उच्चार करत मोदींनी योगसनांना सुरुवात केली.