विवाहित महिलांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा आणि मगच Thank You म्हणा...

काही गोष्टी तर इतक्या बदलतात की हा बदल स्वीकारणंही कठीण होतं

Updated: Jul 4, 2022, 12:51 PM IST
विवाहित महिलांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा आणि मगच Thank You म्हणा...  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : लग्नानंतर प्रत्येक स्त्रीचं आयुष्य बदलतं. काही गोष्टी तर इतक्या बदलतात की हा बदल स्वीकारणंही कठीण होतं. अखेर या सर्व गोष्टी विकोपास जातात आणि भांडणांचा खटका उडतो. (Relationship Tips for married woman read details)

वैवाहिक आयुष्यात आनंदी आनंदच असेल याची काहीच हमी देता येत नाही, कारण दोन स्वभावाची माणसं एकत्र आलेली असताना त्यांना या नात्यात समतोल राखायचा असतो. 

आज आपण वैवाहिक महिलांनी त्यांच्या या नात्यात समतोल राखण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे, यावर लक्ष देणार आहोत. 

बऱ्याचदा असं होतं की, बाळाच्या जन्मानंतर महिलांचं संपूर्ण लक्ष बाळावर केंद्रित असतं. अशा वेळी पतीकडे अजाणतेपणानं दुर्लक्ष होतं. परिस्थिती अनेकदा टोकाशीही जाते. जिथं पतीच्या मनात आपण पत्नीसाठी महत्त्वाचे नाही का? असेही प्रश्न घर करतात. 

महिलांनी ही बाब लक्षात ठेवावी. बाळाचं संगोपन ही आईप्रमाणंच वडिलांचीही जबाबदारी आहे. त्यामुळं बाळाचे वडिलही त्याच्याकडे तितकंच लक्ष देणार जितकं त्याची आई. मुद्दा असा, की कुटुंबामध्ये प्रत्येक घटक महत्त्वाचा असल्यामुळं कोणालाही डावलून चालणार नाही. 

बऱ्याचदा अती प्रेमही नात्यासाठी घातक ठरतं. तुमच्या नात्यामध्ये जर वारंवार भांडणं होत आहेत तर, नात्यातलं प्रेम कमी झालंय का हा विचारही मनात आणू नका. 

कित्येकदा अशी परिस्थिती ओढावते जेव्हा नात्यामध्ये असणारं प्रेमच शत्रू ठरतं. भांडणं, मतभेद वाढू लागतात. पती वादाला कंटाळल्यानंतर अबोला वाढतो आणि नात्यातली दरी रुंदावत जाते. 

सततचे भांडण तंटे, वाद टाळण्यासाठी नात्यात कायम स्पष्टवक्तेपणा ठेवा. काही गोष्टींचा मनाशी निर्धार करा. वाद कोणताही असो, तो काही मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकणार नाही याची काळजी घ्या.