अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासावर रॉकेट हल्ला

अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दूतावासाला लक्ष्य केलं गेलं आहे. दूतावासाच्या आत गेस्ट हाऊसवर रॉकेट हल्ला केला गेला आहे. सकाळी ११.१५ मिनिटांनी हा हल्ला झाला. पण यामध्ये कोणताही भारतीय व्यक्ती जखमी नाही झाल्याची माहिती आहे. 

Updated: Jun 6, 2017, 04:06 PM IST
अफगाणिस्तानमध्ये भारतीय दुतावासावर रॉकेट हल्ला title=

काबुल : अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये भारतीय दूतावासाला लक्ष्य केलं गेलं आहे. दूतावासाच्या आत गेस्ट हाऊसवर रॉकेट हल्ला केला गेला आहे. सकाळी ११.१५ मिनिटांनी हा हल्ला झाला. पण यामध्ये कोणताही भारतीय व्यक्ती जखमी नाही झाल्याची माहिती आहे. 

भारतीय गेस्ट हाउसमधील कंपाउंडच्या वॉलीबॉल कोर्टमध्ये हे रॉकेट पडलं. येथे भारतीय अॅंबेसडरचं घर आहे. दूतावासातील स्टाफ देखील तेथेच आजुबाजुला राहतो. रॉकेटच्या या हल्ल्यात कोणीही जखमी नाही झालं. हा हल्ला कोणी केला याची माहिती अजून मिळालेली नाही. या घटनेनंतर संपूर्ण राजधानी हायअलर्टवर आहे.